पंतप्रधान मोदी यांचे मशिदीत भाषण; बोहरा समुदायावर स्तुतीसुमने

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था

मध्य प्रदेश मधील एका मशिदीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी भाषण केले. “या समाजाचे देशप्रेम हे सगळ्या भारतासाठी एक आदर्श उदाहरण ठरावे असे असल्याचे सांगितले. “बोहरा समुदाय हा शांतीचा संदेश देत जगतो. हा शांतीचा संदेश भारताचं जगातल्या अन्य देशांपेक्षा असलेलं वेगळेपण अधोरेखीत करतो,” मोदी म्हणाले. अशारा मुबारक या इमाम हुसेन यांच्या पुण्यतिथीला झालेल्या कार्यक्रमात इंदूरमध्ये पंतप्रधान सहभागी झाले होते. इस्लामी वर्षाच्या सुरुवातीला अशारा मुबारक पाळण्यात येतो. प्रेषित मोहम्मदांचे नातू इमाम हुसेन यांच्या आठवणी या काळात जागवण्यात येतात.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले,”गुजरातमधल्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत बोहरा समुदायाशी माझे अत्यंत चांगले संबंध जुळले होते अशी आठवण मोदींनी सांगितली. मला प्रत्येकवेळी बोहरा समुदायानं सहकार्य केले असे मोदी म्हणाले. बोहरांचे धार्मिक प्रमुख सय्यदना मुफद्दल सैफुद्दिन यांची पंतप्रधानांनी भेट घेतली. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही उपस्थित होते.

इस्रो हेरगिरी :शास्त्रज्ञ नारायणन यांना चोवीस वर्षांनी मिळाला न्याय

या वर्षाअखेरीस मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका असून भाजपासाठी या दृष्टीनं पंतप्रधानानांची भेट अत्यंत महत्त्वाची आहे. इंदूरमध्ये मोठ्या प्रमाणावर बोहरा समाजाचे लोक राहत असून उज्जैन व बुऱ्हाणपूरचाही विचार केला तर मध्यप्रदेशमध्ये एकूण अडीच लाख बोहरा मुस्लीम राहतात.

[amazon_link asins=’B07417987C,B00L8PEEAI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a9496eb-b825-11e8-ab6c-8dcdb49bb187′]