मध्यप्रदेश : भाजपच्या दोन आमदारांनी केले कमलनाथ सरकारच्या बाजूने मतदान

भोपाळ : वृत्तसंस्था – कर्नाटकात काँग्रेस जेडीएस चे सरकार पडल्यानंतर भाजपची नजर मध्यप्रदेश मधील कमलनाथ सरकारवर आहे. कालच मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी म्हंटले होते की, मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकार पडल्यास त्याला आम्ही जबाबदार नाही असे म्हणून त्यांनी मध्यप्रदेश सरकार पडणार असल्याचे संकेत दिले होते. परंतु आता भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. मध्यप्रदेश विधानसभेत सरकारकडून सादर करण्यात आलेल्या क्रिमिनल लॉ (अमेंडमेंट) बिलावर भाजपच्या दोन आमदारांनी कमलनाथ सरकारला साथ दिली आहे. याचा संदर्भ देत कमलनाथ यांनी भाजपवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, दररोज भाजप आम्हाला अल्पमताचे सरकार असल्याचे सांगत हे सरकार कधीपण पडू शकते असे मत व्यक्त करते. आज क्रिमिनल लॉ (अमेंडमेंट) बिलावर झालेल्या मतदानात भाजपच्या दोन आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले.

विधानसभेत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी चर्चेदरम्यान विरोधी पक्षाला उद्देशून म्हणाले की, आम्ही बहुमत चाचणी करायला कधीही तयार आहोत, काँग्रेसचे सरकार पूर्ण पाच वर्ष चालेल. मध्यप्रदेशमधील जनतेचा विकास करण्यासाठी आमही कायम कटिबद्ध असल्याचे मत कमलनाथ यांनी व्यक्त केले.

आरोग्यविषयक वृत्त –