Indore police | इंदूर पोलिसांची वेबसाईट हॅक; बॉम्बस्फोटाची धमकी दिल्याने शहरात रेड अलर्ट

इंदूर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  इंदूर पोलिसांची (indore police) अधिकृत वेबसाईट सायबर चोरट्यांनी हॅक (hacked) करुन शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे इंदूर शहर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट(red alart) जारी करण्यात आला असून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. Indore police website hacked; Red alert in city over bomb threat

याबाबत इंदूरचे पोलीस महानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्रा (Indore police website hacked) यांनी सांगितले की, इंदूर पोलिसांची वेबसाईट हॅक सायबर चोरट्यांनी हॅक केली होती. ती त्वरीत रोखली गेली आहे. आरोपींना लवकरच पकडू. दरम्यान बॉम्बच्या धमकीमुळे सुरक्षेविषयक खबरदारी म्हणून इंदूर व जवळच्या जिल्ह्यात अलर्ट देण्यात आला आहे. शहरात साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बॉम्बशोधक व नाशक पथके तैनात करण्यात आली आहेत.

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने रविवारी लखनौमध्ये अल कायदाच्या दहशतवाद्यांचा कट उद्धवस्त केल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मध्य प्रदेशात रेड अलर्ट जारी केला होता.

Web Title : Indore police website hacked; Red alert in city over bomb threat

Advt.

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Corona in India : कोरोना संकटाचा कहर सुरूच ! 24 तासात आढळले 38 हजार नवीन रूग्ण, 624 संक्रमितांचा मृत्यू

Pune Crime | ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ ! FB पोस्ट टाकत पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या

Pune Crime | वाईच्या सराईत चोरट्याकडून 3 मोटारसायकल जप्त; कोंढवा पोलिसांची कामगिरी