‘इंदोरी पोहा’सह ४ पदार्थांना आता ‘जीआय’ टॅग

इंदूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदूर शहरातील प्रसिद्ध ‘इंदोरी पोहा’ आणि माळवा प्रांतातील इतर तीन प्रसिद्ध खाद्य पदार्थांना जिओग्राफीकल इंडिकेशन (जीआय) मिळवण्याचा प्रयत्न येथील खाद्य पदार्थ निर्मात्यांच्या संघटनेने सुरु केला आहे.

नाश्त्यासाठी ‘इंदोरी पोहा’ प्रसिद्ध आहे. पुणे, मुंबईसारख्या शहरात खास इंदोरी पोहाची दुकाने उभारली असून तिला चांगला प्रतिसाद मिळतोय. इंदोरी पोहा हे आता देशभर प्रसिद्ध झाले आहे.

माळवा प्रांतातील ‘दूध से बनी शिकंजी’ (दुधापासून बनवलेले गोड पेय), लौंग सेव (लवंगेचा स्वाद असलेली शेव) आणि ‘खट्टा मीठा नमकीन’ स्थानिक तसेच देशभर रसिक खवय्यांमध्ये लोकप्रिय आहे.
इंदूर मिठाई और नमकीन निर्माता-विक्रेता व्यापारी संघाचे सचिव अनुराग बोथरा यांनी आम्ही वरील चार पदार्थांना जीआय टॅग मिळवण्यासाठी अर्ज केला असल्याचे सांगितले आहे.

जी आय टॅग मुळे त्या पदार्थाच्या लोकप्रियतेत वाढ होतेच शिवाय त्याला आपली अशी आंतरराष्ट्रीय खास ओळखही लाभते.

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या