इंदुरीकर महाराजांनी ‘ते’ वक्तव्य करायला नको होतं, पण… : चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – इंदुरीकर महाराज यांच्या सम-विषम तारखांना स्त्रीसंग या वक्तव्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. अनेक सामाजिक संस्था, महिला संघटनांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यादरम्यान आता भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी इंदुरीकर महाराजांच्या त्या वक्तव्यांचे अप्रत्यक्ष समर्थन केले आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते यावेळी त्यांनी इंदुरीकर महाराजांच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य केले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, इंदुरीकर महाराजांच्या त्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करत नाहीत, त्यांनी ते वक्तव्य करायला नको होते. परंतु एका वक्तव्याने माणूस खराब होत नाही असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष पदी नव्याने पुर्ननियुक्ती झाल्यानंतर चंद्रकात पाटलांनी आज पहिल्यांदाच मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे चंद्रकांत पाटलांनी इंदुरीकर महाराजांची पाठराखण केली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, एखाद्या वक्तव्याने व्यक्ती खराब होत नाही. माध्यमांना मी सल्ला देतो की एखाद्या वक्तव्याने माणसाची राख करु नका. इंदुरीकर महाराज कीर्तनातून जनप्रबोधन करतात.

राज्यातील सरकारवर टीका करताना चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीचे नेते वारंवार खोटं बोलले असा आरोप त्यांनी लावला. ते पुढे म्हणाले की विरोधात बसण्याचा जनादेश मिळूनही ते सत्तेत बसले. परंतु आम्ही सरकार पाडणार नाही.

You might also like