निर्माता इंद्रजीत लंकेशचा दावा, म्हणाले – ‘कन्नड चित्रपटसृष्टीत 15 जण ड्रग माफिया’

कर्नाटक : वृत्त संस्था – चित्रपट निर्माता आणि पत्रकार इंद्रजित लंकेश यांनी चित्रपटसृष्टीत अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये १५ लोक सहभागी असल्याचा दावा केलेला आहे. लंकेश यांनी ड्रग रॅकेट विरोधातील माहिती देताना बंगळुरू पोलिसांच्या समर्थनार्थ हा दावा केलेला आहे.

१५ अमली पदार्थांच्या तस्कारीमध्ये सहभागी असणाऱ्या १५ व्यक्तींची नावे सांगाताना लंकेश म्हणाले की, “मी या १५ जणांना ड्रग माफिया म्हणून आळखतो.”

केंद्रीय गुन्हे शाखेने सुमारे पाच तास लंकेश यांची चौकशी केली. लंकेश यांनी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो यांना लक्षात घेऊन अमली पदार्थांच्या तस्कारी रॅकेटसंदर्भात सांगितले की, “अमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये कर्नाटकातील प्रमुख संगीतकार आणि अभिनेतेदेखील सहभागी आहेत.”

चित्रपटसृष्टीत अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात करण्याच्या प्रयत्ना १५ जण आहेत. चौकशी दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस विभाग या संदर्भात आणखी चौकशी करीत आहे. इंद्रजीत लंकेश यांनी वरील आरोप अभिनेता चिरंजीवी सरजा यांच्या मृत्यूनंतर केलेले आहेत.