Indrani Balan Foundation | भारतीय लष्कर व इंद्राणी बालन फाऊंडेशच्या ‘डॅगर परिवार स्कूल’चा वर्धापन दिन उत्साहात साजरा; काश्मीरमधील बारामुल्ला येथे कार्यक्रम संपन्न

‘भारतीय संस्कृतीच्या इतिहासात काश्मीरचे योगदान अतुलनीय’ – पुनीत बालन

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने (Indrani Balan Foundation) व भारतीय लष्कर (Indian Army) यांच्यावतीने काश्मीर खोऱ्यातील दिव्यांग मुलांसाठी स्थापन केलेल्या ‘डॅगर परिवार स्कुल’चा (Dagger Parivaar School) पहिला वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील या लहान मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan) आणि जान्हवी धारीवाल-बालन (Janhavi Dhariwal Balan) हे या वर्धापन दिन समारंभासाठी आवर्जून उपस्थित होते. (Indrani Balan Foundation)

 

 

काश्मीरमधील बारामुल्ला येथील ‘डॅगर परिवार स्कुल’मध्ये विविध वैद्यकीय समस्या असलेली ७५ मुले आहेत. या शाळेचा पहिला वर्धापन दिन दि. १ नोव्हेंबर रोजी साजरा झाला. या विशेष वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, समूह गीत, सोलो डान्स आदी विविध उपक्रम सादर केले. या विद्यार्थ्यांचे मनमोहक सादरीकरण आणि त्यांच्या उत्साहाचे उपस्थित पालक आणि शासकीय अधिकार्‍यांनी कौतुक केले. भारतीय लष्कर आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ यांनी काश्मिर खोर्‍यात सुरू केलेल्या या उपक्रमांचे सर्व उपस्थितांनी आवर्जून कौतुक केले. यावेळी ‘डॅगर परिवार स्कुल’च्या मुख्याध्यापिका साबिया फारूक (Sabia Farooq) यांनी प्रथम वार्षिक अहवाल सादर केला. शाळेचे वर्षभरातील कामकाज आणि प्रगती पाहून जान्हवी धारिवाल-बालन आणि पुनीत बालन यांनी कौतुक केले. तसेच विद्यार्थी आणि शाळेसाठी केलेल्या मेहनतीबद्दल शिक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. (Indrani Balan Foundation)

 

व्हीएसएम, जीओसी 19 इन्फंट्री डिव्हिजन मेजर जनरल अजय चंदपुरिया यांनी याप्रसंगी मुलांच्या पालकांशी संवाद साधला आणि स्थानिक नागरिकांच्या विकासासाठी भारतीय सैन्याच्या पाठिंब्याचे कौतुक केले.

 

या कार्यक्रमाला बारामुल्ला येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामुल्ला आणि शिक्षण विभाग, बारामुल्ला यांचा समावेश असलेल्या विविध प्रशासकीय कार्यालयांनी पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले. शाळेतील मुलांच्या पालकांनी या कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक काश्मिरी नागरिकांना शक्य ते सर्व प्रकारे पाठिंबा देण्याच्या भारतीय सैन्याच्या संकल्पावर लोकांचा विश्वास आणखी दृढ केला.

 

“आपल्या देशात विविध प्रकारच्या संगीत आणि कलेची संस्कृती आहे.
भारताच्या संस्कृतीच्या इतिहासात काश्मीरचे योगदान अत्यंत मोठे आहे.
आज या मुलांनी आपल्या कामगिरीतून देशाची समृद्ध संस्कृतीचं जे दर्शन घडवलं ते पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला.”

– पुनीत बालन, अध्यक्ष, इंद्राणी बालन फाऊंडेशन व पुनीत बालन ग्रुप

(Punit Balan, Chairman, Indrani Balan Foundation and Punit Balan Group)

 

Web Title :- Indrani Balan Foundation | 1st Annual Day Function Of
The Indian Army Dagger Parivaar School Built By Indrani Balan Foundation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा