Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! द गेमचेंजर्स संघाचा विजयाचा षटकार; वैंकिज् इलेव्हन संघाचा विजयाचा चौकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indrani Balan Foundation | स्पोर्ट्सफील्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत द गेमचेंजर्स संघाने सलग सहावा तर, वैंकिज् इलेव्हन संघाने सलग चौथा विजय मिळवत स्पर्धेत आपली घौडदौड कायम ठेवली. (Indrani Balan Foundation)

मुंढवा येथील लिजंडस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या गटसाखळी फेरीत सुजित उबाळे याच्या नाबाद ७० धावांच्या जोरावर वैंकिज् इलेव्हन संघाने शिरूर जिमखाना संघाचा ४८ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना वैंकिज् इलेव्हनने २० षटकात ४ गडी गमावून १८० धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये सुजित उबाळे याने नाबाद ७० धावांची खेळी केली. दुसर्‍या बाजुने जयेश राठोड याने ५७ धावा करून उत्तम साथ दिली. याच्या उत्तरादाखल शिरूर जिमखाना क्रिकेट क्लबचा डाव २० षटकामध्ये १३२ धावांवर मर्यादित राहीला. (Indrani Balan Foundation)

सिध्देश वारघंटे याच्या अष्टपैलू खेळीमुळे द गेमचेंजर्स संघाने शिरूर जिमखाना क्रिकेट क्लबचा ८३ धावांनी सहज पराभव करून सलग सहावा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना द गेमचेंजर्स संघाने २० षटकामध्ये ५ गडी गमावून १७९ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये युवराज प्रदीप याने नाबाद ६३ धावांची तर, सिध्देश वारघंटे याने ५७ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना शिरूर जिमखाना क्रिकेट क्लब संघाचा डाव ९६ धावांवर गडगडला. संकेत चव्हाण (३-८) आणि सिध्देश वारघंटे (३-२५) यांनी चमकदार गोलंदाजी करून गेमचेंजर्ससाठी गेम चेंज केला.

 

सामन्यांचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
वैंकिज् इलेव्हनः २० षटकात ४ गडी बाद १८० धावा (सुजित उबाळे नाबाद ७० (४०, ६ चौकार, ५ षटकार), जयेश राठोड ५७ (३९, ९ चौकार), चेतन कुरांदळे १-३२) वि.वि. शिरूर जिमखाना क्रिकेट क्लबः २० षटकात ९ गडी बाद १३२ (राहूल सिंग ३२, प्रशम गांधी २३, सागर बिरदावडे ३-२१, अजित गव्हाणे २-९); सामनावीरः सुजित उबाळे;

 

द गेमचेंजर्सः २० षटकात ५ गडी बाद १७९ धावा (युवराज प्रदीप नाबाद ६३ (३२, ४ चौकार, ४ षटकार), सिध्देश वारघंटे ५७ (२५, ३ चौकार, ५ षटकार), देवदत्त नातू २३, निशांत नगरकर २-२४) वि.वि. शिरूर जिमखाना क्रिकेट क्लबः १८ षटकात १० गडी बाद ९६ धावा (प्रशम गांधी २४, राहूल सिंग २०, संकेत चव्हाण ३-८, सिध्देश वारघंटे ३-२५); सामनावीरः सिध्देश वारघंटे;

Web Title :- Indrani Balan Foundation | First ‘Indrani Balan Winter T20 League’ Cricket Tournament! The Gamechangers team’s winning six; Vanquish XI’s winning strock

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Rains | राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी गारपीट, 3 तासांत ‘या’ जिल्ह्यांत बरसणार सरी

Nashik Crime | दुर्दैवी ! पाटावर पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

Income Tax Alert | जर कॅशमध्ये केली ‘ही’ 5 कामे तर येईल टॅक्स संदर्भात नोटिस ! जाणून घ्या इन्कम टॅक्सचे नियम