Indrani Balan Foundation | इंद्राणी बालन फाउंडेशनच्या पुढाकारातून काश्मीरच्या बारामुल्लामध्ये डॅगर परिवार स्कूलचे उद्घाटन

- भारतीय लष्कराच्या चिनार कोअर बरोबर सामंजस्य करारातून शाळा उभारणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इंद्राणी बालन फाउंडेशन, पुणे (Indrani Balan Foundation) आणि भारतीय लष्कराची (Indian Army) चिनार कोअर यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचा भाग म्हणून काश्मीरमधील बारामुल्ला (kashmir baramulla) येथे डॅगर परिवार स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. 2017 पासून बारामुल्ला परिसरातील दिव्यांग मुलांसाठी ही शाळा सुरु आहे. काश्मीरसारख्या दहशतीच्या छायेतील राज्यात मुलांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये या हेतूने इंद्राणी बालन फाउंडेशनने या शैक्षणिक उपक्रमासाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला. चिनार कोअर बरोबरच्या संयुक्त प्रयत्नांतून डॅगर परिवार स्कूलसाठीअद्ययावत आणि भव्य इमारतीचे बांधकाम इंद्राणी बालन फाउंडेशनतर्फे (Indrani Balan Foundation) करण्यात आले आहे.

 

बारामुल्ला येथे नुकत्याच झालेल्या विशेष कार्यक्रमात 15 कोअरच्या आर्मी वाईफ्स वेलफेअर असोसिएशनच्या विभागीय अध्यक्ष उषा पांडे आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्या (Indrani Balan Foundation) जान्हवी धारिवाल (janhvi dhariwal) यांच्या हस्ते शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. चिनार कोअरचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे (Lt. Gen. D. P. Pandey), इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन (Puneet Balan, President of Indrani Balan Foundation), डॅगर डिव्हिजनचे जीओसी मेजर जनरल वीरेंद्र वत्स, बारामुल्लाचे पोलिस अधिक्षक रईस मोहंमद भट आणि प्रशासकीय अधिकारी तौसिफ रैना, ब्रिगेडियर अमित धीर, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

 

बारामुल्ला परिसरातील 150 पेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डॅगर परिवार स्कूल महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
दिव्यांग मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन या शाळेच्या इमारतीची रचना करण्यात आली आहे.
त्यांच्या क्षमतांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम आणि आवश्यक उपचार पद्धती या शाळेत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

चिनार कोअरचे जीओसी लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी बारामुल्लामधील विद्यार्थ्यांसाठी
इंद्राणी बालन फाउंडेशनने घेतलेल्या पुढाकाराबद्दल प्रशंसा केली.

 

इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन (Puneet Balan, President of Indrani Balan Foundation) म्हणाले,
भारतीय लष्कराच्या चिनार कोअरबरोबर करण्यात आलेल्या सामंजस्य कराराचा भाग म्हणून आर्मी गुडविल स्कूल्सला पायाभूत सुविधा,
तांत्रिक आणि शैक्षणिक स्थैर्य देण्याला आमचे प्राधान्य असेल.
काश्मीरमधील विद्यार्थ्यांना सर्वप्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी
इंद्राणी बालन फाउंडेशन सर्वतोपरी योगदान देणार असल्याची ग्वाही पुनीत बालन यांनी यावेळी दिली.

 

Web Title :- Indrani Balan Foundation | Inauguration of Dagar Parivar School in Baramulla, Kashmir through the initiative of Indrani Balan Foundation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMPML चा तोटा 700 कोटी रुपयांवर पोहोचणार ! ‘आर्थिक’ उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजनांचा विचार सुरू

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला अडथळा ठरणारा लकडी पूलावरील मेट्रो पूलाबाबत मध्यम मार्ग काढणारच – आबा बागूल

Pune Anti Corruption | 2.5 लाखाची लाच घेताना पुण्यातील शिक्षण संस्थेच्या महिला अध्यक्षासह तिघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, शैक्षणीक क्षेत्रात प्रचंड खळबळ