Indrani Balan Foundation | नरवीर तानाजी रन ! मेजर जनरल इंद्रजित सिंह आणि इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ; रनला सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि सिंहगड किल्ले (Sinhagad Fort) विजयाच्या ३५१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून भारतीय लष्कराच्या (Indian Army) दक्षिण कमांड Southern Command (India) आणि इंद्राणी बालन फाउंडेशनतर्फे (Indrani Balan Foundation) नरवीर तानाजी रनचे (Narveer Tanaji Run) आयोजन करण्यात आले होते. राजगड ते सिंहगड दरम्यान आयोजित या रनची आखणी करण्यात आली. (Indrani Balan Foundation)

 

नरवीर तानाजी रनचे यंदा पहिले वर्ष असल्याने स्पर्धेऐवजी प्रेरणादायी उपक्रमाच्या स्वरुपात या रनचे आयोजन करण्यात आले. राजगडावर भारतीय लष्कराच्या दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे प्रमुख मेजर जनरल इंद्रजित सिंह (Major General Inderjit Singh) आणि इंद्राणी बालन फाउंडेशनचे (Indrani Balan Foundation) अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan) यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करुन या रनला सुरुवात झाली. ४ फेब्रुवारी १६७० रोजी मराठी सैन्याने सिंहगड काबिज करण्यासाठी जो मार्ग निवडला, त्याच मार्गावरुन ही रन संपन्न झाली. सब्बल ६० अंशांपर्यंत तीव्र चढउतारांमुळे हा मार्ग खडतर होता, मात्र उत्साही स्पर्धकांनी अवघ्या चार तासांत ही रन पूर्ण करत सिंहगडावर प्रवेश केला. गडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याजवळ या रनचा समारोप झाला.

 

 

समारोप सोहळ्यात भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन (Lt Gen JS Nain) यांनी सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्र दिले. राजगड ते सिंहगड या दरम्यानच्या खडतर मार्गावरील वाटचाल पूर्ण करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीची गरज अधोरेखित करत लेफ्टनंट जनरल नैन यांनी नरवीर तानाजी रनमध्ये सहभाग घेतलेल्या लष्करी अधिकारी आणि नागरिकांची प्रशंसा केली.

नरवीर तानाजी रन हा कल्पक आणि अद्वितीय उपक्रम सैन्यदलांतील जवान, अधिकारी आणि नागरिक यांच्या एकत्रित सहभागातून संपन्न झाला.
३५१ जणांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. त्यांपैकी २०० जण लष्करी सेवेतील तर १५१ जण सर्वसामान्य नागरिक, क्रीडापटू होते.
नरवीर तानाजी रनच्या मार्गावर सहभागी ॲथलिट्सचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी क्लायंबिंग, रॅपलिंगच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
सिंहगडावर शस्त्रास्त्र प्रदर्शन आणि पाईप बॅण्डच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामुळे रनमधील सहभागींमध्ये शौर्य, साहस आणि देशभक्तीचा उत्साह चेतवण्यास मदत झाली.

 

Web Title :- Indrani Balan Foundation | Narveer Tanaji run! Flag off by Major General Inderjit Singh and Punit Balan, President of Indrani Balan Foundation; The run begins

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात दहावीत शिकणार्‍या मुलीचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, घात की अपघात?

 

Urfi Javed Superhot Video | टॉप काढून उर्फीनं बांधला फक्त पट्टा, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केली ‘ही’ मागणी

 

NCP-BJP | भाजपला मोठा धक्का ! पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याची कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये ‘एन्ट्री’