Indrani Balan Foundation | इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतनी लोणी ग्रामस्थांना रुग्णवाहिका, उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते लोकर्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशन (Indrani Balan Foundation) व पुनीत बालन ग्रुपच्या (Puneet Balan Group) वतीने आंबेगाव येथील माजी विद्यार्थी विकास प्रबोधनी व ग्रामपंचायत लोणी यांना 15 लाख रुपयांची रुग्णवाहिका (Ambulance) देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण इंद्राणी बालन फाउंडेशनचे (Indrani Balan Foundation) अध्यक्ष उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते माजी विद्यार्थी विकास प्रबोधनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज (Uday Singh Walunj) आणि सरपंच उर्मिला धुमाळ (Sarpanch Urmila Dhumal) यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी देऊन करण्यात आले.

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी माजी सरपंच उद्धवराव लंके, सावळेराम नाईक, दिलीप वाळुंज, पुनीतबालन ग्रुप चे सदस्य चेतन लोखंडे, अशोक आदक पाटील, राष्ट्रपती पदक विजेते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किसन गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, पिंटू पडवळ, उद्योजक राजु वाळुंज, सुरेश वाळुंज, प्रकाश वाळुंज, अविनाश वाळुंज, नवनीत सिनलकर, मयूर लोखंडे,सोमनाथ कदम, पांडुरंग वाळुंज, चंद्रकांत गायकवाड, पोलीस पाटील संदीप आढाव,बाळशिराम वाळुंज,सतीश थोरात,सुमित वाळुंज आदी उपस्थित होते.

माजी विद्यार्थी विकास प्रबोधनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज म्हणाले, इंद्राणी बालन फाउंडेशन (Indrani Balan Foundation), आरएमडी फाउंडेशन (RMD Foundation) यांच्या मार्फत लोणी येथे कोट्यवधी रुपये खर्च करुन भैरवनाथ विद्याधाम विद्यालयाची (Bhairavanath Vidyadham Vidyalaya) सुसज्य इमारत बांधण्यात येत आहे. याशिवाय गावाजवळ असलेल्या तळ्याचे काम केल्यामुळे परिसरातील नैसर्गिक पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे उन्हाळ्यात भासणाऱ्या पाणी टंचाईची तीव्रता कमी झाली आहे.

आरएमडी फाउंडेशनच्या वतीने परिसरात 7 हजार झाडांचे वृक्षारोपण (Tree Plantation) करण्यात आले.
फाउंडेशनने दिलेल्या रुग्णवाहिकेमुळे अपघातातील जखमींना वेळेत उपचार मिळण्यासाठी मदत होणार आहे.
या रुग्णवाहिकेचा उपयोग परिसरातील आठ गावातील नागरिकांना होणार असल्याचे चेतन लोखंडे यांनी सांगितले.
यावेळी लोणी येथे बैलगाडा शर्यतीसाठी (Bullock Cart Race) घाट बांधून देण्याचे निवेदन अशोक आदक पाटील
यांनी पुनीत बालन यांना दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश वाळूंज यांनी केले तर आभार उदयसिंह वाळुंज
यांनी मानले.

Web Title :-  Indrani Balan Foundation | pune balan foundation presents an ambulance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Georgia Andriani | अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने केले फोटोशूट, मांडीवरील लाल धनुष्याच्या टॅटूने वेधले लक्ष

Eknath Khadse | एकनाथ खडसेंना भाजपचा आणखी एक धक्का