Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेमचेंजर्स’ संघाचे सलग दोन विजय !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Indrani Balan Foundation | स्पोर्ट्सफील्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत द गेमचेंजर्स संघाने कल्याण क्रिकेट क्लब आणि फ्रेन्डस् क्रिकेट क्लब या संघांचा पराभव करून स्पर्धेत सलग दोन विजय मिळवले. द गेमचेंजर्स संघाचा हा सलग पाचवा विजय ठरला. (Indrani Balan Foundation)

 

मुंढवा येथील लिजंडस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अतुल वीटकर याच्या ५७ धावांच्या जोरावर द गेमचेंजर्स संघाने कल्याण क्रिकेट क्लबचा ५ धावांनी पराभव केला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना द गेमचेंजर्सने २० षटकात ५ गडी गमावून १५२ धावा जमविल्या.
यामध्ये अतुल वीटकर (५७ धावा), अदवय सिधये (३६ धावा) आणि आदिल अन्सारी (२३ धावा) यांनी संघासाठी महत्वपूर्ण धावा जमविल्या.
चौथ्या गड्यासाठी आदिल आणि अतुल यांनी ४० चेंडूमध्ये ६७ धावांची भागिदारी केली व संघाला दिडशे धावांचा टप्पा गाठून दिला.
कल्याण क्रिकेट क्लबच्या रोहीत गुगळे (५८ धावा) आणि हिमांशु अगरवाल (४१ धावा) यांनी प्रतिकार करून संघाला विजयाच्या समीप नेले होते.
पण मोक्याच्या क्षणी फलंदाज बाद होत गेल्याने संघाला २० षटकात ३ गडी गमावून १४७ धावाच जमविता आल्या.

 

दुसर्‍या सामन्यात तुषार श्रीवास्तवच्या ७८ धावांच्या तडाखेबाज खेळीमुळे द गेमचेंजर्सने फ्रेन्डस् क्रिकेट क्लबचा ६१ धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना गेमचेंजर्सने १८८ धावांचे आव्हान उभे केले होते. यामध्ये तुषार श्रीवास्तव याने ४४ चेंडूंमध्ये ९ चौकार व २ षटकारांसह ७८ धावा चोपल्या.
या आव्हानापुढे फ्रेन्डस् क्रिकेट क्लबचा डाव २० षटकात १२७ धावांवर मर्यादित राहीला. द गेमचेंजर्स संघाचा पाचव्या साखळी सामन्यातील हा सलग पाचवा विजय ठरला. (Indrani Balan Foundation)

 

सामन्यांचा सविस्तर निकालः

 

१) द गेमचेंजर्सः २० षटकात ५ गडी बाद १५२ धावा (अतुल वीटकर ५७ (३४, ७ चौकार, १ षटकार), अदवय सिधये ३६, आदिल अन्सारी २३, चिराग शेरकर २-१८)
(भागिदारी-चौथ्या गड्यासाठी आदिल आणि अतुल यांच्यात ६७ (४०) वि.वि. कल्याण क्रिकेट क्लबः २० षटकात ३ गडी बाद १४७ धावा
(रोहीत गुगळे ५८ (५१, ६ चौकार, ३ षटकार), हिमांशु अगरवाल ४१ (३७, ५ चौकार), संकेत चव्हाण १-२६);

 

सामनावीरः अतुल वीटकर;

 

२) द गेमचेंजर्सः २० षटकात ५ गडी बाद १८८ धावा (तुषार श्रीवास्तव ७८ (४४, ९ चौकार, २ षटकार), देवदत्त नातू ३३, अतुल वीटकर २४, सागर आनंदपुरे २४,
चंद्रशेखर पाटील १-२४) वि.वि. फ्रेन्डस् क्रिकेट क्लबः २० षटकात ६ गडी बाद १२७ धावा (सौरभ रवालिया ३५, सुदीप २४, देवदत्त नातु ३-१४);

सामनावीरः तुषार श्रीवास्तव;

 

Web Title : Indrani Balan Foundation | The first ‘Indrani Balan Winter T20 League’ cricket tournament; The Gamechangers win twice in a row!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Parambir Singh | परमबीर सिंग आणखी ‘गोत्यात’ ! अटकेतील महिला PI आशा कोरके आणि PI गोपालेचा धक्कादायक खुलासा

Benefits of Mor Pankh | ‘मोरपंख’ प्रत्येक संकटावर रामबाण उपाय, जाणून घ्या याच्याशी संबंधीत 7 उपाय आणि सविस्तर माहिती

Pune Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाची पिंपरी चिंचवडमध्ये मोठी कारवाई ! बनावट स्कॉच व व्हिस्की जप्त; 7 लाखांचा मुद्देमाल जप्त