Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, एमईएस क्रिकेट क्लब यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indrani Balan Winter T-20 League | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप आणि एमईएस क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. (Indrani Balan Winter T-20 League)

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रीतम पाटील याच्या नाबाद १०९ धावांच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने न्युट्रीलिशियस् संघाचा ७९ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने २४५ धावांचा डोंगर उभा केला. प्रीतम पाटील याने ५५ चेंडूत ८ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद १०९ धावांची खेळी केली. मेहूल पटेल (४२ धावा) आणि धनराज शिंदे (नाबाद ३७ धावा) यांनी दुसर्‍या बाजूने प्रीतमला सुरेख साथ दिली. या आव्हानाला उत्तर देताना न्युट्रीलिशियस् संघाचा डाव १६६ धावांवर मर्यादित राहीला. प्रीतम पाटील याने ३७ धावात ४ गडी बाद करून गोलंदाजीमध्येसुद्धा कमाल केली. (Indrani Balan Winter T-20 League)

 

सुशिल बुरर्ले याच्या अचूक गोलंदाजीमुळे एमईएस क्रिकेट क्लबने पुना क्लब संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुना क्लब संघाचा डाव ९० धावांवर गडगडला. अजिंक्य नाईक (३१ धावा) आणि सागर बिरदावडे (३६ धावा) यांनी धावांचे योगदान दिले. सुशिल बुर्ले याने १५ धावात ४ तर, आकाश जाधव याने ९ धावात ३ गडी टिपत पुना क्लबचा डाव मोडून काढला. हे आव्हान एमईएस क्रिकेट क्लबने १६.१ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केले. हर्षल हाडके याने नाबाद ४७ धावा तर, जय पांडे (२६ धावा) आणि अदवय सिधये (नाबाद १९) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः
पुनित बालन ग्रुपः २० षटकात ३ गडी बाद २४५ धावा (प्रीतम पाटील नाबाद १०९ (५५, ८ चौकार, ८ षटकार),
मेहूल पटेल ४२ (२७, ८ चौकार), धनराज शिंदे नाबाद ३७ (११, १ चौकार, ५ षटकार); (भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी प्रीतमआणि मेहूल यांच्यात ७५ (३७);
तिसर्‍या गड्यासाठी प्रीतम आणि सिद्धार्थ यांच्यात ८० (४४) वि.वि. न्युट्रीलिशियस्ः १९.१ षटकात १० गडी बाद १६६ धावा
(अर्थव काळे ४४, वैभव विभुते नाबाद ४४, प्रीतम पाटील ४-३७, अक्षय दरेकर २-२२); सामनावीरः प्रीतम पाटील;

 

पुना क्लबः १७.२ षटकात १० गडी बाद ९० धावा (अजिंक्य नाईक ३१, सागर बिरदावडे ३६, सुशिल बुर्ले ४-१५,
आकाश जाधव ३-९) पराभूत वि. एमईएस क्रिकेट क्लबः १६.१ षटकात १ गडी बाद ९५ धावा (हर्षल हाडके नाबाद ४७
(४८, ६ चौकार, १ षटकार), जय पांडे २६, अदवय सिधये नाबाद १९); सामनावीरः सुशिल बुरर्ले;

 

Web Title :- Indrani Balan Winter T-20 League | Indrani Balan Winter T-20 League Punit Balan Group, MES Cricket Club fight for the title

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | अनुकूल अहवाल देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणारा विधी सल्लागारासह दोघांना अटक; अशा प्रकारची पहिलीच कारवाई

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | कसबा व चिंचवडमध्ये मनसेचा भाजपला पाठिंबा, महाविकास आघाडीचे टेन्शन वाढलं?

Keshav Upadhye | ताई, महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? भाजपचा सुप्रिया सुळेंना खोचक सवाल