×
Homeक्रीडाIndrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२०...

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; एमईएस क्रिकेट क्लबचा सलग चौथा विजय; व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा सलग दुसरा विजय !!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indrani Balan Winter T20 League 2022 | बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत एमईएस क्रिकेट क्लब संघाने सलग चौथा तर, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने सलग दुसरा विजय नोंदविला. (Indrani Balan Winter T20 League 2022)

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात वैभव गोसावी याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एमईएस क्रिकेट क्लबने पुनित बालन ग्रुप संघाचा २ गडी राखून पराभव केला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात पुनित बालन ग्रुपने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकामध्ये १४० धावांचे आव्हान उभे केले. हर्षल काटे (नाबाद ३९ धावा), प्रीतम पाटील (३३ धावा) आणि ओंकार खाटपे (२२ धावा) यांनी संघाच्या डावाच्या बांधणी केली. जलदतगती गोलंदाज वैभव गोसावी याने २० धावात ३ गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली. हे आव्हान एमईएस क्रिकेट क्लबने २० व्या षटकात गाठले. हर्षल हाडके (३३ धावा) आणि रोहीत हाडके (नाबाद २३ धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाला विजयाच्या समीप नेले. अखेरच्या षटकामध्ये १० धावांची आवश्यकता होती आणि २ चेंडूंवर ५ धावांची गरज असताना वैभव गोसावी याने चौकार मारून संघाला विजयी केले. (Indrani Balan Winter T20 League 2022)

धीरज बाहुरे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीने माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा ५ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना माणिकचंद ऑक्सिरीच संघाने १८४ धावांचे आव्हान उभे केले. श्रीधर बारोट (नाबाद ५९ धावा), हर्ष संघवी (४६ धावा), अनिकेत पोरवाल (२९ धावा) आणि ऋषभ राठोड (२६ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. धीरज बाहुरे याने २२ धावात ४ गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली. हे आव्हान व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १८.५ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. श्रीकांत पवार (५३ धावा), अभिजीत भागवत (४४ धावा) आणि विश्‍वजीत राजपुत (४४ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाला विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पुनित बालन ग्रुपः २० षटकात ६ गडी बाद १४० धावा (हर्षल काटे नाबाद ३९, प्रीतम पाटील ३३, ओंकार खाटपे २२,
वैभव गोसावी ३-२०, गौरव जोत्शी २-२०) पराभूत वि. एमईएस क्रिकेट क्लबः २० षटकात ८ गडी बाद १४१ धावा
(हर्षल हाडके ३३, रोहीत हाडके नाबाद २३, पुनित बालन २-३२); सामनावीरः वैभव गोसावी

माणिकचंद ऑक्सिरीचः २० षटकात ६ गडी बाद १८४ धावा (श्रीधर बारोट नाबाद ५९ (३९, ५ चौकार, ३ षटकार),
हर्ष संघवी ४६, अनिकेत पोरवाल २९, ऋषभ राठोड २६, धीरज बाहुरे ४-२२, बळीराम तुपे २-२०) पराभूत वि.
व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १८.५ षटकात ६ गडी बाद १८८ धावा (श्रीकांत पवार ५३ (३१, ८ चौकार, २ षटकार),
अभिजीत भागवत ४४, विश्‍वजीत राजपुत ४४, ऋषभ राठोड १-२२); सामनावीरः धीरज बाहुरे

 

Web Title :- Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; MES Cricket Club’s fourth win in a row; Vision Cricket Academy’s second win in a row!!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत

Must Read
Related News