Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा दुसरा विजय, हेमंत पाटील संघाची विजयी सलामी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indrani Balan Winter T20 League 2022 | बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत माणिकचंद ऑक्सिरीच संघाने दुसरा विजय मिळवला. हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने स्पर्धेत पहिला विजय मिळवत गुणांचे खाते उघडले. (Indrani Balan Winter T20 League 2022)

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत रोहन फंड याच्या कामगिरीच्या जोरावर माणिकचंद ऑक्सिरीच संघाने एसके डॉमिनेटर्स संघाचा केवळ पाच धावांनी पराभव करून दुसरा विजय नोंदविला. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात गोलंदाजांनी कमाल केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना माणिकचंद ऑक्सिरीच संघाला ९९ धावा जमविता आल्या. ऋषभ राठोड (२० धावा), हर्ष संघवी (१९ धावा) आणि निलय नेवासकर (१७ धावा) यांच्या फलंदाजीमुळे संघाने ९९ धावा धावफलकावर लावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना एसके डॉमिनेटर्सचा डावही गडगडला. शुभम कटाळे (२१ धावा) आणि सुखेल श्रीखंडे (२० धावा) या फलंदाजांशिवाय खेळपट्टीवर कोणीच टिकाव धरू शकले नाही. एसके संघाचा डाव ९४ धावांवर संपुष्टात आला. रोहन फंड (२-१३) आणि सुरज राय (२-१२) यांनी अचूक गोलंदाजी करून संघाचा विजय सोपा केला. (Indrani Balan Winter T20 League 2022)

हरी सावंत याच्या ८० धावांच्या खेळीमुळे हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने पुणे पोलिस संघाचा १५६ धावांनी सहज पराभव केला. हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीने पहिल्यांदा फलंदाजी करताना २०६ धावांचे आव्हान उभे केले. हरी सावंत याने ५० चेंडूत ६ चौकार व ६ षटकारांसह ८० धावा फटकावल्या. सुधांश गुंदेटी (५१ धावा) आणि स्वप्निल फुलपगारे (३७ धावा) यांनी दुसर्‍या बाजूने योग्य साथ दिली व संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना पुणे पोलिस संघाचा डाव ५० धावांवर आटोपला. ऋतुराज धुलगुडे याने ५ धावात ४ गडी टिपले. हरी सावंत (२-६) आणि आदित्य राजहंस (२-८) यांनीही अचूक गोलंदाजी केली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
माणिकचंद ऑक्सिरीचः १६.१ षटकात १० गडी बाद ९९ धावा (ऋषभ राठोड २०, हर्ष संघवी १९, निलय नेवासकर १७,
अजय बोरूडे ३-१४, हितेश बनसोडे ३-२०, यश माने २-२४) वि.वि. एसके डॉमिनेटर्सः १५.५ षटकात १० गडी बाद ९४
धावा (शुभम कटाळे २१, सुखेल श्रीखंडे २०, रोहन फंड २-१३, सुरज राय २-१२); सामनावीरः रोहन फंड

 

हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ५ गडी बाद २०६ धावा (हरी सावंत ८० (५०, ६ चौकार, ६ षटकार),
सुधांश गुंदेटी ५१ (३०, २ चौकार, ५ षटकार), स्वप्निल फुलपगारे ३७, पृथ्वीराज गायकवाड ३-३१) वि.वि.
पुणे पोलिसः १३ षटकात १० गडी बाद ५० धावा (विपुल गायकवाड १२, ऋतुराज धुलगुडे ४-५, हरी सावंत २-६,
आदित्य राजहंस २-८); सामनावीरः हरी सावंत

 

Web Title :- Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Second win for Manikchand Oxyrich team, Hemant Patil team’s winning opening

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले