शीना बोरा हत्याकांडातील मुखर्जी दांपत्याचा घटस्फोटासाठी अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

कुप्रसिध्द शीना बोरा हत्याकांडाची मास्टर माईड इंद्राणी मुखर्जी सध्या सर्व ठिकाणाहून अडचणीत आली आहे. पीटर मुखर्जी व इंद्राणी मुखर्जी दोघांनी आज घटस्फोटासाठी मुंबईतील बांद्रा येथे अर्ज केला आहे.  म्हणतात ना.. अडचणी आल्या तर सगळी कडूनच येतात हेच खरं!  शीनाच्या हत्येचा कट व हत्या या प्रकरणी इंद्राणी सध्या जेलची हवा खात आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ad7301c5-bb3b-11e8-8c6e-8983129466a2′]

पीटर मुखर्जी इंद्राणीच्या सहमतीने घटस्फोट देणार असल्याचे जून महिन्यातच समजले होते. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात हे दोघेही तुरुंगात असल्यामुळे घटस्फोटाच्या प्रक्रियेला वेळ लागत होता. आज या दोघांनी कौटुंबीक न्यायालयात अर्ज सादर केला.

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राला आहे ‘हा’ आजार 

पीटरने एप्रिल महिन्यात इंद्राणीला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. यावर उत्तर देत इंद्राणीने आपल्या दोघांमधील पती-पत्नीनेचे नाते पुन्हा कधीही जुळण्यापलिकडे गेलं आहे असे या नोटीसमध्ये म्हटले होते. पीटरनेही या नोटीसला होकार देत रिजस्टर पोस्टाने उत्तर पाठवले होते.

दर्ग्यातील झाडाच्या फळाने तृतीयपंथीयालाही अपत्यप्राप्ती : मौलानाचा वादग्रस्त दावा

एप्रिल २०१२ मध्ये इंद्राणीने तिच्या मुलीची अर्थात शीना बोराची निर्घुणपणे हत्या केली. या प्रकरणाचा खुलासा २०१५ मध्ये झाला होता. याप्रकरणी पीटर, इंद्राणी आणि इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयात खटला सुरु आहे.

You might also like