इंद्रायणी एक्सप्रेसच्या इजिनात बिघाड

लोणावळ : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस या गाडीचे लोणवळा स्टेशनवर इंजिन नादुरुस्त झाले. त्यामुळे या गाडीला सुमारे ५० मिनिटे उशीर झाला असून तिच्या पाठोपाठ येणाऱ्या सर्व गाड्या वाटेत अडकून पडल्या.

मुंबईहून पुण्याकडे येणारी इंद्रायणी एक्सप्रेस आपल्या नेहमीच्या वेळी ८ वाजून १० मिनिटांनी लोणावळा रेल्वे स्टेशनवर वेळेवर आली. स्टेशनवर थांबल्यानंतर तिच्या इंजिनामध्ये बिघाड झाला. त्यामुळे तिच्या पाठोपाठ येणाऱ्या सर्व गाड्या वाटेत थांबवून ठेवण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्या  इंजिनाच्या सहाय्याने हे इंजिन बाजूला करुन दुसरे इंजिन लावण्यात आले. या सर्व प्रकार सुमारे ५० मिनिटांचा वेळ गेला. दुसरे इंजिन लावून इंद्रायणी एक्सप्रेस सकाळी ९ वाजता पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आली.

दरम्यान, वेगवेगळ्या कारणामुळे रेल्वेगाड्या, लोकल या सातत्याने उशिरा धावत असल्याचे त्याच्या निषेधार्थ डोंबिवली रेल्वे स्टेशनवर काही प्रवाशांनी आंदोलन केले. रेल्वे अधिकारी, अभियंते यांनी आंदोलन करणाऱ्याची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर एक तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like