इंद्रायणी नदीत कोसळलेली कार सापडली ; अद्याप २ युवक बेपत्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मावळ येथे इंद्रायणी नदीत कोसळलेली कार सापडली आहे. ही कार रात्री आठच्या सुमारास शोधण्यास शिवदुर्ग व एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. मात्र या कारमधील दोन युवक अद्याप बेपत्ता असून त्यांचे शोधकार्य़ सुरु आहे. ही घटना गुरुवारी (दि. १) दुपारी दीडच्या सुमारास घडली होती. या घटनेत अक्षय संजय ढगे हा युवक बाचवला आहे. तर कार चालक संकेत असवले आणि अक्षय जगताप हे दोघे अद्याप बेपत्ता आहेत.

मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक पुलाचा कठडा तोडून कार इंद्रायणी नदीच्या पाण्यात पडली. कार आणि त्यामधील दोन युवकांना शोधण्यासाठी एनडीआरएफ आणि शिवदुर्गच्या पथकांना पचारण करण्यात आले. तसेच शोधकार्यात पाणबुडीचा वापर करण्यात आला. कार पाण्यात पडल्याची बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नागरिकांनी पुलावर गर्दी केली होती.

वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत असवले, अक्षय जगताप व अक्षय ढगे हे तीन मित्र असवले यांच्या स्विप्ट डिझायर कारने काही कारणानिमित्त कान्हे मावळ येथे गेले होते. कान्हे येथून घरी टाकवे येथे येताना कान्हे टाकवे रोडवरील टाकवे गावच्या हद्दीतील इंद्रायणी नदीच्या पुलावरून जाताना कार भरधाव वेगात पुलावरील लोखंडी संरक्षक कठडे तोडून नदीत कोसळली. या कारमध्ये असलेल्या तिघांपैकी अक्षय ढगे याने प्रसंगावधान राखत कारमधून सुटका करून वेगाने वाहणाऱ्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून पोहत नदीचा किनारा गाठत स्वःताचा जीव कसाबसा वाचविला.

आरोग्यविषयक वृत्त –