इंद्रायणी नदीच्या कुंडमळ्यात तरुणी बुडाली

तळेगाव : पोलीसनामा ऑनलाईन

भाऊ बहिणीसोबत वर्षाविहारासाठी गेलेल्या सतरा वर्षाची मुलगी पाय घसरुन पडल्याने कुंडमळयात बुडाली यावेळी तिला वाचवताना दोघ बहिण भाऊ बुडाले. ग्रामस्थांनी दोघांना वाचवले मात्र १७ वर्षीय मुलगी आढळून आली नाही. हा प्रकार रविवारी दुपारी घडला.

[amazon_link asins=’B075K7G7SF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’05d97d21-82b9-11e8-86ef-6192e9e6e1d6′]

शालीनी चंद्रबालन (17, रा. आकुर्डी) असे बुडलेल्या मुलीचे नाव आहे. शालिनी ही तिचा भाऊ आणि बहिनीसोबत कुंडमळा येथे वर्षाविहारासाठी गेली होती. कुंडमळा पाहत असताना पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिची मदत करायला गेलेल दोघे बहीण भाऊ ही पाण्यात वाहत होते. हे लक्षात येताच ग्रामस्थांनी मदत करत दोघांना वाचवले. मात्र शालिनीचा शोध लागला नाही. पोलिसांनी शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे जवान बोलवले आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी आहेत.