अकरा लाखाच्या गावठी दारुसह भट्टी उध्वस्त 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, चिंबळीगावात, इंद्रायणी नदीकाठी सुरू असलेल्या गावठी दारू बनविण्याच्या भट्टीवर पोलिसांनी छापा मारला. एक हजार तयार तर ३५ हजार लिटर दारूचे रसायनसह भट्टी ‘जेसीबी’च्या सहाय्याने उध्वस्त केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे.
[amazon_link asins=’B00TFGWAA8,B01FXJI1OY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7b273b3-b8ea-11e8-a259-0fdfd9729a5e’]

सचिन धोंडू तेली (२०, रा. विद्यानगर, चिंचवड), संदीप पांडुरंग अभंगकर (२८, रा. घरकुल, चिखली) आणि दयाराम नाथाजी चौधरी (३५, रा. चिखली) या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, चिंबळीगावात, इंद्रायणी नदीकाठी गावठी दारू बनविण्याचे काम भट्टीवर सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सतीश पाटील, निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी यांच्यासह चाकण विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत अलसटवार आळंदी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र चौधर यांच्यासह पथकाने त्या ठिकाणी जाऊन धाड मारली. त्यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावठी दारू बनविण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. पोलिसांना पाहून हे तिघे पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले.
[amazon_link asins=’B01MSYQWNY,B07DFL5NML’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’edf1e0d5-b8ea-11e8-9b2b-293b038d655d’]

ही भट्टी एवढी मोठी होती की पोलिसांना ती उध्वस्त करण्यासाठी जेसीबी बोलवायला लागला. जेसेबीच्या सहायाने भट्टी पोलिसांनी उध्वस्त केली. गावठी तयार दारू, हातभट्टी बनविण्यासाठी लागणारे साहित्य, रसायन असणारे पिंप, तुरटी, गुळ, लाकडी सरपण व इतर साहित्य नष्ट करण्यात आले आहे.

सदरचा कारवाई अप्पर पाेलिस आयुक्त मकरंद रानडे, सहा. पाेलिस आयुक्त सतिश पाटील, चाकण विभागाचे सहा. पाेलिस आयुक्त चंद्रकांत अलसटवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवडचे पाेलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सपाेनि गणेश पाटील, सपाेनि दिपाली मरळे, पाे. हवा. प्रमाेद वेताळ, कैलास बाबडे, प्रमाेद लांडे, राजेंद्र शेटे, प्रविण दळे, राजेश परंडवाल, आप्पासाहेब कारकुड, महादेव धनगर, दिलीप लाेखंडे, पाे.ना.अमित गायकवाड, तानाजी गाडे, सुरेंद्र आढाव, किरण चाेरगे, संताेष बर्गे, हेमंत खरात, पाे.शि. प्रदिप गाडे, प्रमाेद हिरळकर, स्वप्निल शिंदे, सुनिल चाैधरी, गाेपाल ब्राहमदे यांनी केली आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.