×
Homeताज्या बातम्याIndurikar Maharaj Accident | प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात

Indurikar Maharaj Accident | प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Indurikar Maharaj Accident | प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Famous Kirtankar Indurikar Maharaj) यांच्या गाडीला रात्री जालन्यामध्ये अपघात (Indurikar Maharaj Accident) झाला आहे. जालना (Jalna) जिल्ह्यामधील परतूर (Partur) येथे रात्री 10 वाजता खांडवीवाडी येथून कीर्तनाला (Kirtan) जाताना परतूरमध्ये त्यांच्या गाडीची धडक लाकडी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक झाली.

 

या अपघातामध्ये इंदोरीकर महाराजांना सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. त्यांच्या गाडीचा वाहन चालक संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समजत आहे. अपघाताची (Indurikar Maharaj Accident) माहिती मिळताच परतुरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले होते.

 

जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात स्थळावरून इंदोरीकर महाराज

यांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी येथे सोडण्यात आल्यानंतर नियोजित वेळेत महाराजांचं कीर्तन पार पडलं.

महाराजांच्या अपघाताची माहिती समजल्यावर अपघातस्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.

 

दरम्यान, इंदोरीकर महाराज त्यांच्या कीर्तनाच्या खास शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कीर्तनालाही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तरूणांमध्येही महाराजांची क्रेझ आहे.

 

 

 

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर

Kirit Somaiya On Thackeray Government | किरीट सोमय्यांचा पुन्हा इशारा; म्हणाले – ‘ठाकरे सरकारचा नवा घोटाळा उद्या बाहेर काढणार’

Pune Crime | प्रेम विवाहानंतर 5 महिन्यात तरुणीची आत्महत्या, पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीने उचलले टोकाचं पाऊल

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान प्रकरणी NCB च्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

Must Read
Related News