Indurikar Maharaj | ‘इंदोरीकर महाराज लस घेत नाहीत, तोपर्यंत कीर्तन होऊ देऊ नका’, शेतकरीपुत्राची CM ठाकरेंकडे मागणी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) ओसरल्याचे पहायला मिळत आहे. भारताने 100 कोटींचा कोरोना प्रतिबंधक लसीचा टप्पाही पार केला आहे. देशातील सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. याच दरम्यान प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही, असे विधान केले होते. यानंतर आता जोपर्यंत इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) लस घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची किर्तने (kirtan) होऊ देऊ नये, अशी मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे एका शेतकरीपुत्राने केली आहे.

 

कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचे वर्तन केले. आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवले.
त्यांना वेगळ्या ताटात जेवण दिले गेले. त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या.
त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतके फटकून त्यांच्याशी वागले. इथे हात लावू नको, तिथे हाथ लावू नका, अशी सर्व परिस्थिती होती.
मात्र मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर लस कशाला घ्यायची.
असे इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी म्हटले होते.
यानंतर एका शेतकरीपुत्राने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी केली आहे.

दरम्यान, इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी त्यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.
निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना शास्त्रीय दृष्टिकोनातून, अध्यात्मिक दृष्टीकोनातून महाराजांकडे ज्ञान आहे.
मी स्वत: वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईन. किर्तनाकर इंदोरीकर ज्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करतात.
समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून संदेश देतात, तो त्यांच्या स्टाइलमुळे लोकांना भावतो.
त्यामुळे कीर्तनाला मोठी गर्दी होते. त्यांनी लसी संदर्भात वक्तव्य केले असेल तर मी त्यांच्याशी नक्कीच भेटून बोलेन, असे टोपे म्हणाले होते.

 

Web Title : Indurikar Maharaj | beed farmer son demands do not allow indurikar maharaj perform kirtan until complete corona vaccine

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation Elections | मतदारयादी दुरूस्तीची जनजागृती करण्यासाठी पुणे महापालिकेने घेतली सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची बैठक

Mumbai Crime | धक्कादायक ! रेल्वेत महिलांच्या डब्यात नराधमाचे चक्क ‘हस्तमैथुन’ अन् ‘अश्लिल’ चाळे, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ

Pune ST Workers Strike | पुण्यातील शिवाजीनगरच्या वाकडेवाडीत ST कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन (व्हिडीओ)