इंदुरीकर महाराज यांची आज कोर्टात महत्त्वाची सुनावणी

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन – अमुक दिवशी स्त्रिसंग केला तर मुलगा होतो किंवा मुलगी होते’ असे वक्तव्य केल्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर आज इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. संगमनेर कोर्टात आता इंदोरीकर महाराज आज कोर्टात हजर राहणार का? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

इंदुरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. मात्र, त्यांनी हे वक्तव्य कुठे आणी कधी केले याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचे कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत मात्र पाठपुरावा करून संबंधित प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिल्यानंतर 26 जुन रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.त्या प्रकरणी संगमनेर कोर्टाने इंदुरीकर महाराज यांना समन्स बजावले असून आज कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिलेला आहे.