Indurikar Maharaj | समाजप्रबोधनकार इंदूरीकर महाराजांच्या सासूबाईंचा भाजपात प्रवेश; प्रवेश करताच म्हणाल्या…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिध्द किर्तनकार म्हणून ख्याती असलेल्या इंदूरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) सासूबाईंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. इंदूरीकरांच्या सासुबाई शशिकला पवार या संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. (Indurikar Maharaj)

 

शशिकला शिवाजी पवार या अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या सुशीला उत्तम पवार यांच्यावर २२७ मतांनी विजय मिळवला. अपक्ष निवडणूक लढवताना त्या नारळ या चिन्हावर निवडून आल्या. त्यानंतर त्या निळवंडेच्या सरपंचपदी विराजमान झाल्या. त्यांनी यावेळी बोलताना गावच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणूकीत बाळासाहेब थोरात गटाने देखील पवार या आपल्या गटात असल्याचा दावा केला होता. पण शशिकला पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. (Indurikar Maharaj)

 

नुकत्याच झालेल्या निळवंडे गावच्या निवडणूकीत शशिकला पवार या अपक्ष सरपंच म्हणून निवडून आल्या.
त्यानंतर बाळासाहेब थोरात गट व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाने ग्रामपंचायतीवर आपला दावा सांगितला.
इंदूरीकर महाराजांच्या सासुबाई असलेल्या शशिकला पवार यांनी दोन्ही नेत्यांशी आपले सलोख्याचे संबंध असून केवळ गावच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवत असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
या दोन्ही नेत्यांनी आपल्याला अगोदर देखील सहकार्य केले आहे.
आणि यापुढे देखील या नेत्यांच्या सहकार्याने आपण गावातील समस्या सोडवू असे शशिकला पवार म्हणाल्या होत्या.
मात्र त्यातच बाळासाहेब थोरात यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहोत.
असे शशिकला पवार म्हणाल्या.

निळवंडे हे गाव माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील असल्याने हा
थोरातांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
संगमनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत थोरात गटाने जिंकल्या असल्या तरी मात्र महत्वाच्या समजल्या
जाणाऱ्या तळेगाव दिघे, घुलेवाडी, निळवंडे या ग्रामपंचायतीवर विखे गटाने यांनी सत्ता मिळवली आहे.

 

Web Title :- Indurikar Maharaj | indurikar maharaj mother in law joined the bjp in the presence of revenue minister radhakrishna vikhe patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chhagan Bhujbal | पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे छगन भुजबळांची मोठी मागणी; म्हणाले…

Vaani Kapoor | पुन्हा एकदा वाणी कपूरच्या बोल्ड अवताराने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Maharashtra ATS | पंजाबमधील गँगस्टर, दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ रिंदा व सोनू खत्री गँगमधील 3 आरोपींना महाराष्ट्र एटीएसकडून अटक