Indurikar Maharaj | ‘दारूची दुकानं अन् सर्व काही सुरू, फक्त देवाची मंदिरे बंद असल्यानं वाईट वाटतं’ – इंदुरीकर महाराज

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – Indurikar Maharaj | कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या संसर्गाचा प्रमाण कमी होऊ लागल्याने लागू केलेले निर्बंध कमी करण्यात आले असून सर्वत्र अनलॉक सुरू झाले आहे. यावरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी राज्यात सर्वत्र अनलॉक होत असताना मंदिरे धार्मिक स्थळे बंदच आहे असे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता प्रसिद्ध प्रबोधनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनीही आता सरकारच्या धोरणावर खंत व्यक्त केली आहे. सर्व काही सुरू आहे दारूची दुकानेही (Liquor Stores). दुःख याचच वाटत की फक्त देवाची मंदिरे बंद आहेत असे त्यांनी म्हंटले आहे.

कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार आणि खुनाच्या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल गावात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. इंदुरीकर महाराज म्हणाले, कोरोनाने संपूर्ण जग हादरले आहे. अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. तरीही यामधून कोणाला शहाणपण आलेलं दिसत नाही. आजही लग्न, इतर कार्यक्रमांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आले. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. आता पर्यंत दोन लाटा येऊन गेल्या आहेत तिसरी लाट येणार आहे यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दारू पासून सर्व काही समजात सुरू आहे. परंतु फक्त देवाची मंदिरे (Temple) बंद आहेत याचे वाईट वाटते असे इंदुरीकर महाराज यांनी म्हंटले.

वारीमुळे कोरोना (Corona) वाढू शकतो हे कारण देत महाराष्ट्रात भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. मात्र कोरोना वगैरे काही नाही ते एक थोतांड आहे. सरकारचा लॉकडाऊनचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. इतक्यावरच न थांबता रस्त्यावर उतरून वारकऱ्यांनी मंदिराची कुलूप तोडायला हवीत असे, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा

786 Serial Number Note | जर तुमच्याकडे सुद्धा आहे 786 नंबरची एखादी नोट तर तुम्ही कमावू शकता 3 लाख रुपये; जाणून घ्या कुठे करावी विक्री

President Election | शरद पवारांना राष्ट्रपती बनवण्यासाठी प्रशांत किशोर यांची कसरत ! राहुल गांधींसोबतच्या बैठकीची Inside story

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Indurikar Maharaj says liquor shops open temples are closed corona situation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update