PM मोदींनी जाहीर केलेल्या ‘महापॅकेज’चं उद्योग जगताकडून ‘स्वागत’

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या लढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. स्वावलंबी भारत अभियानासाठी त्यांनी 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज स्वावलंबी भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र आहे. या महापॅकेजचे उद्योग जगताकडून स्वागत करण्यात आले आहे.

दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण आम्हाला नंतर कळेल की हे परिवर्तन 1991 च्या धर्तीवर होईल की नाही. मला असे वाटते. पंतप्रधानांनी जमीन, श्रम, रोख आणि कायदा सुलभतेबद्दल सांगितले असून त्याचा आम्ही आदर करतो. हेच अर्थव्यवस्थेसमोरील मोठे आव्हान आहे. या चार क्षेत्रात सुधारणा झाल्यास आर्थिक विकासाला या संकटकाळात चालना मिळेल, असे मत सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. तर फक्कीच्या अध्यक्षा संगीता रेड्डी म्हणाल्या की, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, व्यवस्थापन, लोकसंख्या आणि मागणी ही क्षेत्र बळकट केल्यास भारत पुन्हा आर्थिक वृद्धीच्या मार्गावर येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅकेजची घोषणा केली. ही खरंच एक उल्लेखनीय पॅकेज आहे. याची सर्वांना प्रतीक्षा होती. यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे मत असोचेम आणि नारेडकोचे अध्यक्ष डॉ. निरांजन हिरानंदानी यांनी व्यक्त केले आहे.

भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच पायाभूत बाबींना मजबूत केल्यास भारत नक्कीच महासत्ता बनेल. आर्थिक पॅकेज सोबतच कृषी, कर व्यवस्था, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ विकास आणि आर्थिक प्रणालीत सुधारणा केल्यानं गुंतवणुकदार आकर्षित होती. तसंच मागणी वाढवण्यातही मदत मिळेल. मेक इन इंडियाअंतर्गत गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल, असं मत असोचेमचे महासचिव दिपक सूद यांनी व्यक्त केलं. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी याचा नक्की फायदा होईल आणि यामुळे आर्थिक उपक्रमांना चालनाही मिळेल, अशी प्रतिक्रियी पीएचडी चेंबर ऑफ कामर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष डी.के. अग्रवाल यांनी व्यक्त केली.