मोठ्या बहिणीच्या मृत्यूच्या धक्क्यात असताना त्यानं बांगलादेशाला ‘वर्ल्डकप’ जिंकून दिलं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 19 वर्षाखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशच्या युवा संघानं रविवारी इतिहास रचला . अंतिम सामन्यात बांगलादेशनं युवा वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवून जेतेपद पटकावले. बांगलादेशनं प्रथम वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. बांगलादेशाने 19 वर्षाखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करत विजेतेपद पटकावले. या सामन्यात फलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. पण संघातील एका खेळाडूवर कौटुंबिक जीवनात मोठे संकट आले होते. पण ते बाजूला ठेऊन तो वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आला आणि संघाला विजय मिळून दिला.

19 वर्षाखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशच्या युवा संघानं रविवारी इतिहास रचला. अंतिम सामन्यात बांगलादेशनं युवा वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवून जेतेपद पटकावले. बांगलादेशनं प्रथम वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला. तिलक वर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावाची भागीदारी केली. तिलक (३८ ) २९ व्या षटकात माघारी घेतली. यानंतर सर्व डाव हा गडबडला. कर्णधार ध्रुव जुरेल ( 22) वगळता टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांना दुहेरी धाव करता आली नाही. यशस्वीनं फॉर्म कायम राखताना 121 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकाराच्या मदतीनं 88 धावा केल्या. पण तो बाद झाला. भारताचा डाव ४ बाद १५६ वरून सर्वबाद १७७ असा गडबडला .

लक्ष्य गाठत असताना तनझीद हसन आणि परवेझ होसैन इमोन यांनी अर्धशतकीची खेळी केली. पण सामना टीम इंडियाच्या बाजूनं रवी बिश्नोईनं झुकवला. त्यानं 10 षटकांत 3 निर्धाव षटक टाकून 30 धावांत 4 विकेट्स घेतल्या. सामना हरण्याच्या दिशेने जात असताना बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीनं नाबाद 47 धावांची खेळी करताना भारताचा पराभव निश्चित केला. पाऊस आल्यामुळे बांगलादेश समोर ४६ षटकात १७० धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. कर्णधार अकबर अलीने नाबाद 47 धावांची खेळी करत संघाला वन डे वर्ल्ड कप जिंकवून दिला.

दक्षिण आफ्रिकेत अकबर वन डे वर्ल्ड कपसाठी बऱ्याच दिवसांपूर्वी दाखल झाला होता. सरावासाठी बांगलादेशचा संघ सर्वात आधी दाखल झाला होता.  अकबरच्या बहिणीचा २४ जानेवारीला मृत्यू झाला होता . पण देशासाठी वर्ल्ड कप जिकने महत्वाचे होते. म्हणून कुटूंबियांनी त्याला काही सांगितले नव्हते. अकबरला त्याची बहिण सर्वात जास्त प्रिय होती. त्यामुळे जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा ही बातमी आम्ही अकबरला दिली नव्हती. अकबरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर आम्हाला विचारले की ही गोष्ट तुम्ही मला सांगितली का नाही ? तेव्हा आम्हला अकबरला काय सांगावे समजत नव्हते . आम्ही त्यावेळी शांत बसलो, असे त्याचे वडील म्हणाले.