शेवटच्या सामन्यात धोनी ‘इन’, तर कोण होणार ‘आऊट’?

वेलिंग्टन : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध न्युझीलंड यांच्या एक दिवसीय मालिकेतील शेवटच्या समान्यात एम. एस. धोनी परतणार आहे. दुखापतीमुळे चौथ्या सामन्यात धोनी खेळू शकला नाव्हता. मात्र आता धोनी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यात धोनी मैदानावर खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

धोनीच्या संघात परत येण्यामुळे संघातून कोणत्या खेळाडूनला डच्चू देण्यात येईल हे उद्याच्या सामन्यातच समजेल. तज्ञांच्या मते धोनीच्या आगमनाने दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात येऊ शकते. तर पदार्पणाच्या सामन्यात अवघ्या नऊ धावा करणाऱ्या शुभमन गिलला पुन्हा संधी दिली जाऊ शकते.


तिसऱ्या सामन्यापूर्वी धोनीच्या पायाचे स्नायू दुखावले गेल्याने दोन सामन्यासाठी त्याला आराम देण्यात आला होता. आता तो संघात परतला आहे. पाचव्या सामन्यापूर्वी धोनीने कसून सराव केला. विराट-धोनीच्या अनुपस्थितीत भारताला दारूण पराभव स्विकारावा लागला होता. भारताचा अख्खा संघ फक्त ९२ धावांवर गारद झाला होता.

दरम्यान, पाच एकदविसीय सामन्यांच्या मालिकेत भारत ३-१ ने आघाडीवर आहे. भारताने पहिल्या तीन सामन्यात न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवला. मात्र चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा दारूण पराभव केला. त्यामुळे आता पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ कसे प्रदर्शन करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.