मिताली राजने रचला ‘हा’ विक्रम

हेमिल्टन : वृत्तसंस्था – भारतीय महिला संघ न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे. ३ सामन्यांच्या या मालिकेत भारत २-० ने आघाडीवर आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडपुढे शरणागती पत्करल्याचे दिसून आले. भारताचा डाव केवळ १४९ धावांवर बाद झाला.

पण ते असले तरी भारताची कर्णधार मिताली राज हिने जगातील कोणत्याही महिला क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम केला. सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम मिताली राजने केला आहे. महिला क्रिकेट विश्वात २०० सामने खेळण्याचा विक्रम मितालीने आपल्यान नावे केला आहे.न्यूझीलंड विरुद्धची हा सामना मिताली राजचा २०० वा एकदिवसीय सामना ठरला आहे.

मिताली राजने १९९९ साली एकदिवसीय क्रिकेट मध्ये आयर्लंड विरुद्ध पदार्पण केले होते. आतापर्यंत खेळलेल्या २०० एकदिवसीय सामन्यात मितालीने ६६२२ धावा केल्या आहेत. यात १२३ ही मितालीची सर्वोत्तम खेळी आहे. मितालीने एकदिवसीय कारकीर्दीत ७ शतकं तर ५२ अर्धशतकं केली आहेत. गत वर्षात मितालीने इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोट एडवर्ड्सच्या १९१ एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम मोडीत काढला होता. याच विक्रमासोबत महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमदेखील मितालीच्या नावे आहे.

Loading...
You might also like