×
Homeक्रीडाINDW vs AUSW | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

INDW vs AUSW | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

पोलीसनामा ऑनलाइन टीम : INDW vs AUSW | BCCI ने आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. 9 डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही टी-20 मालिका 5 सामन्यांची असणार आहे. या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे असणार आहे, तर मराठमोळ्या स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. (INDW vs AUSW)

 

दक्षिण आफ्रिकेत फेब्रुवारी 2023 मध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेआधी भारताला दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय संघाची प्रमुख खेळाडू पूजा वस्त्राकरला दुखापत झाल्यामुळे ती या मालिकेला मुकणार आहे. तसेच स्नेह राणादेखील या मालिकेत खेळणार नाही. (INDW vs AUSW)

ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवाणी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल.
नेट गोलंदाज – मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर, सिमरन बहादूर.

ऑस्ट्रेलिया – भारत टी-20 मालिकेचे वेळापत्रक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 9 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजता
India विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 11 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजता
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 14 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजता
India विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 17 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजता
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 20 डिसेंबर, सायंकाळी 7 वाजता

 

Web Title :- INDW vs AUSW | indw vs ausw the indian womens squad for the t20 series against australia has been announced with harmanpreet kaur as the captain and smriti mandhana as the vice captain

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत

Must Read
Related News