‘कोरोना’ व्हायरस खाऊन टाकेल तुमची कमाई, ‘या’ राज्यातील लोकांना होईल सर्वात जास्त नुकसान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोराना व्हायरस महामारीनंतर देशाच्या विविध राज्यात लोकांच्या उत्पन्नातील अंतर कमी होईल. या दरम्यान श्रीमंत राज्यांचे उत्पन्न गरीब राज्यांच्या तुलनेत जास्त कमी होण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेच्या संशोधन अहवालात ‘इकोरॅप’ मध्ये याबाबत उल्लेख आहे. यामध्ये म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान ऑल इंडिया लेव्हलवर प्रति व्यक्ती उत्पन्न 5.4 टक्के घटून 1.43 लाख रुपये वार्षिक राहील. अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगना आणि तामिळनाडु सारख्या श्रीमंत समजल्या जाणार्‍या शहरांच्या प्रति व्यक्ती उत्पन्नात 10 ते 12 टक्के घसरण होण्याचा अंदाज आहे. तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसासारख्या राज्यांमध्ये जेथे प्रति व्यक्ती उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे, प्रति व्यक्ती उत्पन्नात आठ टक्केपेक्षा कमी घसरण होण्याची शक्यता आहे.

एसबीआयच्या या संशोधन अहवालात म्हटले आहे की, आम्हाला वाटते की, कोविड-19 महामारीनंतर भारतात लोकांच्या उत्पन्नात असमानतेमधील अंतर कमी होईल. याचे कारण हे असेल की, या महामारी दरम्यान श्रीमंत राज्यांच्या उत्पन्नात गरीब राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत जास्त घसरण होईल. जर्मनीमध्ये ‘जर्मनीची भिंत’ 1989 मध्ये पाडल्यानंतर सुद्धा असमानातेमध्ये कमीचा असाच अनुभव आला होता.

जीडीपीत घसरणीमुळे जास्त आहे प्रति व्यक्ती उत्पनात कमी
अहवालात म्हटले आहे की, प्रति व्यक्ती उत्पन्नात येणार्‍या या घसरणीचे वर्तमान मुल्यांवर अधारित जीडीपीमध्ये येणारी 3.8 टक्केच्या घसरणीपेक्षा जास्त आहे. जागतिक स्तरावर सुद्धा 2020 मध्ये प्रति व्यक्ती जीडीपीमध्ये येणारी 6.2 टक्केची घसरण जगातील सकल घरगुती उत्पादनात येणार्‍या 5.2 टक्के घसरणीपेक्षा जास्त राहील.

श्रीमंत राज्य जास्त होतील प्रभावित
अहवालात म्हटले आहे की, ज्या राज्यांचे प्रति व्यक्ती उत्पन्न ऑल इंडिया लेव्हलच्या सरासरीने जास्त आहे, अशी श्रीमंत राज्य प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत अधिक प्रभावित होतील. या तुलनेत दिल्लीमध्ये प्रति व्यक्ती उत्पन्नात 15.4 टक्केची घसरण आणि चंदीगढमध्ये 13.9 टक्केची संभाव्य घसरण अखिल भारतीय स्तरावर प्रति व्यक्ती उत्पन्नात येणारी 5.4 टक्केच्या घसरणीच्या तुलनेत सुमारे तीन पट जास्त असेल. एकुण आठ राज्यात आणि संघ शासीत प्रदेशांच्या प्रति व्यक्ती उत्पन्नात या दरम्यान दहा अंकात घसरण येण्याचा अंदाज आहे, ही सर्वात चिंता करण्याची बाब आहे. ही राज्य ज्यांच्या प्रति व्यक्ती उत्पन्नात दहा अंकात घसरण येऊ शकते, ती राज्य देशाच्या जीडीपीमध्ये 47 टक्क्यांचे योगदान देत असतात.

रेड झोन परिसरात लॉकडाऊनचा जास्त परिणाम
अहवालात म्हटले आहे की, यामागे सत्य हे आहे की या शहरी परिसरात (रेड झोन परिसर) लॉकडाऊन पूर्ण गांभिर्याने लागू केले गेले. बाजार बंद ठेवले गेले, शॉपिंग मॉल आणि बाजार परिसर बंद राहिल्याने त्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला. एवढा की बाजार उघडल्यानंतरही या बाजारांमध्ये ग्राहकांची संख्या अजूनही इतर दिवसांच्या तुलनेत 70 ते 80 टक्के पर्यंत कमी आहे.

अहवालात आर्थिक वर्ष 2020- 21 च्या दरम्यान जीडीपीत 6.8 टक्के घसरण येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर यामध्ये म्हटले गेले आहे की, देशात आर्थिक वर्ष 2021- 22 च्या दरम्यान ‘इंग्रजी व्ही’ आकाराची तीव्र वाढ नोंद केली जाईल. असे तुलानात्मक आधार वर्ष अनुकुल रहाण्यामुळे होईल.