10 हजारांपेक्षा कमी किंमतीतील ‘हे’ 2 भन्नाट फोन लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

पोलीसनामा ऑनलाईन टीम : गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊन कालावधीत बंद असलेली मोबाइल उत्पादने, विक्री करण्यास केंद्र सरकारने काही अटींवर परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतीय बाजारात लागोपाठ स्मार्टफोनची लाँचिंग करण्यात येत असल्याचं दिसत आहे. इनफिनिक्स ने आपली हॉट ९ स्मार्टफोन मालिका भारतीय बाजारात आणली आहे. यात Infinix Hot 9 Pro आणि Infinix Hot 9 हे स्मार्टफोन्स शुक्रवारी भारतात लाँच केले आहेत. दोन्ही स्मार्ट फोन एकसारखेच दिसतात. मात्र, या दोन्ही फोनमध्ये देण्यात आलेली वैशिष्ट वेगवेगळी आहे. दोन्हीं स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलिओ पी २२ प्रोसेसरसह सुसज्ज आहे.

इनफिनिक्स हॉट ९ स्मार्टफोन सिरीज : किंमत आणि उपलब्धता
इनफिनिक्स हॉट ९ प्रो ची किंमत ९ हजार ४९९ रुपये असून, त्यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे. तर इनफिनिक्स हॉट ९ या स्मार्टफोनची किंमत ८ हजार ४९९ रुपये असून, त्यामध्ये सुद्धा ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आलं आहे. दोन्ही फोनच स्टोरेज मायक्रोएसडी च्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढविण्यात येऊ शकत. इनफिनिक्स हॉट ९ प्रोचा सेल १२ जून रोजी दुपारी १२ वाजता तर हॉट ९ या फोनचा सेल ८ जून रोजी दुपारी १२ वाजता सुरु करण्यात येणार आहे. ग्राहकांना दोन्ही फोन ओशन ब्लु आणि वॉयलेट कलर्समध्ये मिळतील.

वैशिष्ट्ये
इनफिनिक्स हॉट ९ आणि इनफिनिक्स हॉट ९ प्रो या दोन्ही फोनला ६.६ इंचाचा एचडी प्लस एलसीडी आयपीएस डिस्प्ले दिला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट करत असून, हे फोन अँड्रॉइड १० वर चालतात. इनफिनिक्सच्या दोन्ही फोनमध्ये गिगा हर्ट्ज हीलीओ पी २२ ऑक्टा-कोर प्रोसेसर दिलं आहे.

क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप
इनफिनिक्स हॉट ९ प्रोमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगाफिक्सलचा डेप्थ, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि एक अतिरिक्त लाईट सेन्सर देण्यात आलं आहे. प्रो मॉडल मध्ये Quad-LED दिलं आहे. तर इनफिनिक्स हॉट ९ मध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. यात क्सटम बोकेह, एआय एचडीआर आणि एईय ३ डी ब्युटी सारखे फीचर्स दिले आहेत.

सेल्फी कॅमेरा
दोन्ही स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी एलईडी फ्लॅशसोबत ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फी कॅमेरा स्क्रिनवर हॉल पंच डिस्प्ले दिला आहे. फ्रंटला एवन पोर्टेट, एवन ३ डी फेस ब्युटी, वाईड सेल्फी आणि एआर एनिमोजी यासारखे फीचर्स देण्यात आले आहे. दोन्ही स्मार्टफोनला ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, ही बॅटरी ३० तासांपर्यंत टिकते. यात ४ जी टॉक टाईम, १३० तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक, १३ तास गेमिंग आणि १९ दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम देऊ शकते.

फिंगरप्रिंट सेन्सर
इनफिनिक्स हॉट ९ प्रो आणि इनफिनिक्स हॉट ९ मध्ये रियरवरती फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलं आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉकचा सपोर्ट दिला आहे. कनेक्टिविटीसाठी या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ ५, ३.५ एमएम ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ, यूएसबी ओटीजी आणि एक मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आलं आहे. तर दोन्ही स्मार्टफोनमध्ये सेन्सर ई कम्पास, जायरोस्कोप, प्रॉक्सिमिटी सेन्सर आणि अँम्बियंतट लाइट सेन्सर दिलं आहे. तसेच फोनमध्ये डीटीएस साऊंड सपोर्ट देण्यात आलं आहे.