भारतातील सर्वात स्वस्त ‘पॉप-अप सेल्फी’ कॅमेर्‍याचा फोन लॉन्च, ‘एवढी’ आहे किंमत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Infinix S5 Pro भारतात लॉन्च करण्यात आला आहे. सध्या हा भारतातील सर्वात स्वस्त पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन आहे. या नव्या डिव्हाइससह Infinix द्वारे आता S5 सीरीजमध्ये तीन स्मार्टफोन ऑफर केले आहेत. या सीरीजमध्ये पहिल्यांदा Infinix S5 आणि S5 Lite उपलब्ध आहेत.

Infinix S5 Pro ची सर्वात खास बाब म्हणजे यात पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामुळे फोनमध्ये कोणत्याही नॉच शिवाय फुल स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. Honor 9X आणि Tecno Camon 15 Pro सारख्या बजेट फोनमध्ये देखील पॉप अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. परंतु याची किंमत क्रमश: 13,999 रुपये आणि 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

नव्या Infinix S5 Pro ची किंमत सिंगल 4 जीबी रॅम आणि 64 जीबी वॅरिएंटसाठी 9,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन 13 मार्चपासून खरेदी करु शकतील. याची विक्री ऑनलाइन पद्धतीने फ्लिपकार्टवरुन होईल.

ग्राहक 834 रुपये प्रति महिना इतक्या सुरुवाती किंमतीने नो कॉस्ट ईएमआयचा लाभ देखील मिळवू शकतात. ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन फॉरेस्ट ग्रीन आणि वायलेट कलर्समध्ये उपलब्ध करुन दिला आहे. तसेच रिलायन्स जिओची एक्सक्लूसिव ऑफर देखील देण्यात आली आहे. जेथे ग्राहकांना 1,200 रुपये कॅशबॅक 50 रुपयांच्या 24 वाऊचरच्या रुपात देण्यात येतील.

Infinix S5 Pro चे स्पेसिफिकेशन –
यात 480 nits ब्राइटनेस आणि 19:5:9 ऐस्पेक्ट रेश्योसह 6.53 इंच फुल एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह 2.3

GHz क्वॉड-कोर MediaTek Helio P35 प्रोसेसर दिला आहे. कार्डच्या मदतीने इंटरनल मेमरी वाढवता येईल. या स्मार्टफोनमध्ये अ‍ॅण्ड्राइड 10 बेस्ड XOS 6.0 कस्टम स्किन देण्यात आली आहे. यात DTS सराऊंड साऊंड देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G LTE, Wi-Fi b/g/n ब्ल्यूटूथ 4.2 आणि जीपीएस सपोर्ट देण्यात आलेला आहे.

कॅमेरा –
फोटो ग्राफीसाठी Infinix S5 Pro च्या रिअरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा आहे. तसेच यात 2 एमपी डेप्थ सेंसर आणि डुअल – LED फ्लॅशसह एक डेडिकेटेड लो लाइट सेंसर देण्यात आला आहे.

यात फ्रंट सेल्फी कॅमेरा 16 मेगा पिक्सलचा देण्यात आला आहे, हा कॅमेरा पॉप अप सेल्फी आहे. यात फिंगरप्रिंट सेंसर रियर उपलब्ध आहे. सिक्युरिटीसाठी यात फेस अनलॉक सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 4,000 mAh ची आहे.