फक्त 7,999 रूपये ! ‘या’ दिवशी Infinix च्या ‘स्वस्त’ आणि ‘मस्त’ स्मार्टफोनचा Sale ! जाणून घ्या (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   Infinix या मोबाईल कंपनीनं अलीकडेच भारतात बजेट स्मार्टफोन लाँच केला. Infinix Smart 4 Plus असं या फोनचं नाव आहे. खास बात अशी की यात 6000 mAhची बॅटरी आहे. याची स्क्रीन 6.82 इंच असून तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध करण्यात आला आहे. आज आपण या फोनची वैशिट्ये आणि सेलबद्दल माहिती घेऊयात.

वैशिष्ट्ये –

– अँड्रॉईड 10 वर आधारीत XOS 6.2 ऑपरेटींग सिस्टीम
– 6.82 इंच एचडी प्लस स्क्रीन
– ऑक्टाकोर मीडियाटेक हिलियो ए 25 प्रोसेसर
– 3 GB रॅम, 32 GB स्टोरेज (256 जीबी पर्यंत हे स्टोरेज वाढवता येऊ शकतं)
– ड्युएल सिम
– फिंगरप्रिंट सेन्सर (फोनच्या मागील बाजूस)
– 3.5 mm Audio Jack
– 4G VOLTE
– Wifi 802.11 A/B/G/N
– ब्लूटूथ 4.2
– GPS, Micro USB
– DTS-HD Sound
– फास्ट चार्जिंग सपोर्ट
– 6000 mAh बॅटरी
– Dual Camera Support (13 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा जो ट्रीपल एलईडी फ्लॅश आणि डेप्थ सेंसरला सपोर्ट करतो)
– 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा

किंमत आणि सेल

कंपनीनं या फोनची किंमत 7,999 रुपये इतकी ठेवली आहे. 28 जुलै रोजी फ्लिपकार्टवर या फोनच्या विक्रीसाठी पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजल्यापासून हा सेल असणार आहे.