पवित्र रमजान महिन्यात पाकिस्तानचे ‘या’ कारणामुळे दिवाळे !

इस्लामाबाद : वृत्तसंस्था –कर्जबाजारी पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था डबघाईला आलेली आहे. आता तर महागाईने उच्चांक गाठला आहे. पाकिस्तानमध्ये खाण्या-पिण्याच्या पदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत. रमझानच्या महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तू जास्त महाग असतात. त्यामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ आली आहे.

खाद्य पदार्थांच्या किमतीत लक्षणीय वाढ –

ऐन रमजानच्या महिन्यात पाकिस्तानमध्ये महागाईने कहरच केला आहे. पाकिस्तानमध्ये दुधाचे दर १९० रुपये लिटरवर पोहचले असून केळी १५० रुपये डझन झाली आहेत. संत्रे ३६० रुपये किलोनं विकले जात आहे. तर लिंबू आणि सफरचंदाच्या किंमती ४०० रुपये किलोवर पोहचल्या आहेत. मटण ११०० रुपये किलो आहे.स्वयंपाकाचा गॅस आणि इंधनाच्या किंमतींमध्ये सरकारने लक्षणीय वाढ केल्यामुळे अन्य वस्तुंचीदेखील दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मसाले व डाळी, तूप, तांदूळ, बेकरी उत्पादने, पीठ, खाद्यतेल, चहा, गहू यांच्या किंमती सुध्दा एक ते सक्का टक्के काढले आहेत. पाकिस्तानची जनता महागाईने त्रासली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लोक खुलेआम सरकारच्या नीतींचा निषेध करत आहेत.

पाकिस्तानी चलनात २० टक्के घसरण झाली आहे. ही आशियातील १३ मुख्य मुद्रांमध्ये सर्वात कमकुवत मुद्रा आहे. पाकिस्तानात एका डॉलरची किंमत १४८ रुपयांपर्यंत गेली आहे.

Loading...
You might also like