Inflation Price Hike | नवीन वर्षात खिशाला कात्री लागण्याची तयारी, साबणापासून SUV पर्यंतच्या किमती वाढणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Inflation Price Hike | जर महागाईने तुमचे घरातील बजेट बिघडवले असेल तर 2022 हे तुम्हाला ह्यातून दिलासा देणार असेल असे जर वाटत असेल तर कदाचित तुमची निराशा होईल. कारण सध्या वस्तूंच्या किमती वाढण्याचा ट्रेंड आहे आणि अनेक तज्ञांचे असे म्हणणे आहे की महागाईचा दबाव सध्या कायम राहील. (Inflation Price Hike)

 

बाजारातील महागाईचा कल पाहिला तर आता ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती 3 ते 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत. अंडी, ब्रेड, केक, बिस्किटे यासारख्या वस्तूंच्या किमती गेल्या 3 आठवड्यात 8-15 टक्क्यांनी वाढल्या आहेत Britannia Industries, ITC, Parle Products आणि HUL सारख्या FMCG कंपन्यांचे म्हणणे आहे की कृषी उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत. याशिवाय लॉजिस्टिक आणि पॅकेजिंग मटेरियलच्या किमतीतही वाढ झाली आहे.

 

नुकत्याच गुंतवणूकदारांशी झालेल्या चर्चेत ब्रिटानिया इंडस्ट्रीज चे व्यवस्थापकीय संचालक वरुण बेरी (varun berry) म्हणाले कि “कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे आमच्याकडे किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच आम्ही किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने वस्तूंच्या किंमती 6% पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. कंपनी काही उत्पादनांच्या किमती वाढवणार असेल तर काहींच्या वजनात बदल करेल. (Inflation Price Hike)

पार्लेने गेल्या वर्षी मार्चमध्ये आपल्या उत्पादनांच्या किमती 10% पर्यंत वाढवल्या होत्या.
आता कंपनी पुन्हा 20 रुपये किंवा त्याहून अधिक एमआरपी असलेल्या उत्पादनांच्या किमतीत 5 ते 10% वाढ करणार आहे.

 

साबण-Surf Excel ही महाग होणार
2022 मध्ये केवळ खाद्यपदार्थांच्याच नव्हे तर साबण आणि Surf Excel च्या किमती ही वाढणार आहेत.
Lux, Dove, Lifebuoy, Rin आणि Surf Excel यासारखे प्रोडक्ट तयार करणारी कंपनी Hindustan Unilever (HUL) डव चे प्राइस 12%, लक्स चे 10% आणि सर्फ एक्सेल चे 20% पर्यंत वाढवली जात आहे.

 

गाड्याही महागल्या आहेत.
देशातील बहुतांश कार कंपन्यांनी जानेवारीमध्ये त्यांच्या किमती वाढवल्या आहेत.
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने जानेवारी महिन्यात किमती वाढवल्या आहेत.
Maruti Suzuki ने त्यांच्या कारची किंमत 1 वर्षात तीन वेळा वाढवली आहे.
तसेच दुसरीकडे , Mahindra, Kia, Honda, Volkswagen, Toyota आणि Tata सारख्या कंपनीपासून Mercedes Benz, Audi आणि Volvo कंपन्यांनीही त्यांच्या गाड्यांच्या किमती 1 ते 4 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.
अशा परिस्थितीत कार खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला 8 हजार ते 60 हजार रुपयांचा फटका बसणार आहे.

 

त्याच वेळी, रॉयल एनफिल्ड आणि Hero MotoCorp च्या किंमती देखील जानेवारीमध्ये टू-व्हीलर सेगमेंटमध्ये वाढल्या आहेत.
हिरोच्या मोटारसायकल 2 हजार रुपयांनी महागल्या आहेत, तर रॉयल एनफिल्डच्या किमतीत 3 ते 5 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

 

तसेच कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (CEAMA) चे असे म्हणणे आहे कि या क्षेत्रातील किमती 5 ते 7 टक्क्यांनी वाढणार आहेत.

 

Web Title : Inflation Price Hike | soaps to suvs all consumer items set to get costlier in 2022 inflation price hike

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा