सर्वसामान्यांना मोठा धक्का ! मोहरीचे तेल, रिफाईंड, चहा, दुधासह ‘या’ वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ, जाणून घ्या किती पैसे मोजावे लागणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   वाढत्या महागाईने सर्वसामान्यांची कंबरडे मोडले आहे. तांदूळ, मसूर, पीठ, मोहरीचे तेल, सोयाबीन तेल किंवा चहा किंवा मीठ या जीवनावश्यक गोष्टींचे भाव एका वर्षात इतके वाढले आहेत की स्वयंपाकघरचे बजेट कोलमडले आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार, 1 एप्रिल 2020 पर्यंत खाद्य तेलाच्या किंमती 47 टक्क्यांनी, डाळींच्या किंमती 17 टक्क्यांनी आणि खुल्या चहाच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढल्या. त्याच वेळी, भात दर 14.65 टक्के, गव्हाचे पीठ 3.26 टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान, साखर स्वस्त झाली आहे.

जाणून घ्या किती वाढले खाद्य तेलांचे दर ?

अहवालानुसार, खाद्यतेलांच्या किंमती गेल्या एका वर्षात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पॅक पाम तेलाची किंमत 87 रुपयांवरून 121 रुपयांवर, सूर्यफूल तेल 106 वरून 157, वनस्पति तेल 88 वरून 121 आणि मोहरीचे तेल (पॅक) प्रतिलिटर 117 वरून 151 रुपयांवर पोहोचले आहे. तसेच शेंगदाणे 139 वरून 165 आणि सोया तेल 99 वरून 133 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहेत.

Advt.

चहा आणि दुधाचा लेटेस्ट दर

खाद्य तेलाव्यतिरिक्त चहा आणि दुधाच्या किंमतीही वाढल्या आहेत. एका वर्षात खुली खुली चहापावडर 217 वरून ते 281 किलोपर्यंत पोहोचले आहेत. चहाच्या दरात एकूण 29 टक्के वाढ झाली आहे. या एका वर्षात मीठाच्या भावातही दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी दूध 7 टक्क्यांनी महाग झाले आहे. दरम्यान, ग्राहक व्यवहार मंत्रालयाला दिलेली ही आकडेवारी देशभरातील 135 रिटेल सेंटरपैकी 111 सेंटरवरून गोळा केली गेली आहे.

डाळीचा वाढता भाव

ताज्या आकडेवारीनुसार तूर डाळ 91 रुपये किलोवरून रुपये 106 रुपये, उडीद डाळ 99 वरून 109 रुपये, मसूर डाळ 68 वरून 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. मूग डाळही 103 रुपयांवरून 105 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे.