वृत्त वाहिनीच्या कार्यालयातील महिला पत्रकाराशी आर्वाच्च भाषेत वाद घातला; राम कदमांच्या कार्यकर्त्यांचा प्रताप

मुंबई :पोलीसनामा आॅनलाइन

दहिहंडी उत्सवात बोलताना मुलींना पळविण्याचे खुलेआम वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्राचा रोष ओढावून घेणारे घाटकोपरमधील भाजपचे आमदार राम कदम यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. आता कदम यांच्या कार्यकर्त्यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीच्या कार्यालयात फोन करून महिला प्रतिनिधींशी अर्वाच्य भाषेत वाद घातला आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

लोकांच्या मुली पळवण्याची भाषा करणाऱ्या राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी आता आपल्या नेत्याचा कित्ता गिरवण्यास सुरूवात केली आहे. आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्यावर या एबीपी माझा वृत्त वाहिनीवर चर्चा झाली. या चर्चेत मनसेकडून अविनाश अभ्यंकर सहभागी झाले होते. राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी अभ्यंकर यांच्या वक्तव्याची मोडतोड करुन, त्यांनी शिवीगाळ केल्याचा खोटा प्रचार सुरु केला आहे. हे कार्यकर्ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी एबीपी माझाच्या कार्यालयात फोन करुन महिला प्रतिनिधींसोबत अर्वाच्च भाषेत वाद घातला. राम कदम यांच्या सांगण्यावरूनच हे कार्यकर्ते हे उद्योग करत असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलिसांना चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे एबीपी माझाने म्हटले आहे.

महिलांविषयी बेताल वक्तव्य केल्याने भाजप आमदार राम कदम यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. त्यात आता आणखी भर पडली आहे. मुंबईतील घाटकोपर आणि सोलापुरातील बार्शीमध्ये राम कदमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपरमध्ये राम कदम यांच्यावर कलम ५०४ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये कलम ४०५, ५०५ ब नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा, असे वक्तव्य राम कदम यांनी दहिहंडी उत्सवात केले होते. यानंतर राज्यात मोठा गदारोळ उठला असून भाजप अडणीत सापडला आहे.

[amazon_link asins=’B0778JFC13,B0146QJTDC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d6523dcf-b3fa-11e8-a62f-c3677050ad0f’]