मानवी शरीरात ०.२ मिग्रॅ सोने, त्‍यातील बहुतांश रक्‍तात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रक्ताशी संबंधित अशा अनेक रंजक बाबी आहेत. शरिरात अखंडपणे वाहणाऱ्या रक्ताबाबत बरीच नवी आणि वेगळी माहिती आहे. मानवी शरीरात सुमारे ०.२ मिग्रॅ सोने असते आणि याची सर्वाधिक मात्रा रक्तामध्ये आढळते. म्‍हणजेच ४०,००० लोकांच्या रक्तातून ८ ग्राम सोने काढले जाऊ शकते. रक्त हा मानवी शरिरातील अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे.

रक्तदान केलेल्या एका बॅगेमुळे तीन जणांचे प्राण वाचवता येऊ शकतात. केवळ मादी मच्छर हे माणसाच्या शरीरातील रक्त पितात. तर नर मच्छर हे शाकाहारी असतात. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात एक लाख मैल लांबीच्या रक्त वाहिन्या असतात. आपले हृदय संपूर्ण आयुष्या पंधरा लाख बॅरल एवढे रक्त पंप करते. गर्भवती महिलेच्या शरीरात वीसाव्या आठवड्यानंतर पूर्वीपेक्षा ५० टक्के अधिक रक्त असते. आपल्या शरीराच्या एकुण वजनापैकी ८ टक्के वजन हे रक्ताचे असते. शरीरातील एकुण रक्ताच्य तुलनेत पांढऱ्या पेशींचे प्रमाण केवळ १ टक्का असते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/