सोन्यासारखे शरीर ! मानवी शरीरात असते ०.२ मिग्रॅ सोने

पोलीसनामा ऑनलाइन टीम – परमेश्वराने सोन्यासारखे शरीर दिले आहे, त्याची काळजी घेतली पाहिजे, असे अनेकजण म्हणतात. परंतु, सोन्यासारखे शरीर या शब्दात खूप तथ्य आहे. कारण आपल्या शरीरात सोन्याची मात्रा आहे, हे प्रयोगातून सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे शरीरातील या सोन्याचे जास्त प्रमाण हे मानवी रक्तात आहे. शरिरात अखंडपणे वाहणाऱ्या रक्ताशी संबंधित अशा अनेक रंजक बाबी आहेत. मानवी शरीरात सुमारे ०.२ मिग्रॅ सोने असते आणि याची सर्वाधिक मात्रा रक्तामध्ये आढळते. म्हणजेच ४०,००० लोकांच्या रक्तातून ८ ग्राम सोने मिळू शकते.

तज्ज्ञ सांगतात की, रक्तदान केलेल्या एका बॅगेमुळे तीन जणांचे प्राण वाचवता येऊ शकतात. तीन जणांचे प्राण वाचविण्याची क्षमता एका रक्ताच्या बॅगेत असल्याने रक्त हे सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. शिवाय रक्तात सोने असतेच ! मानवी रक्ताबाबत अनेक रंजक बाबीपैकी एक म्हणजे केवळ मादी मच्छर हे माणसाच्या शरीरातील रक्त पितात.

तर नर मच्छर हे शाकाहारी असतात. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात एक लाख मैल लांबीच्या रक्त वाहिन्या असतात. आपले हृदय संपूर्ण आयुष्या पंधरा लाख बॅरल एवढे रक्त पंप करते. गर्भवती महिलेच्या शरीरात वीसाव्या आठवड्यानंतर पूर्वीपेक्षा ५० टक्के अधिक रक्त असते. आपल्या शरीराच्या एकुण वजनापैकी ८ टक्के वजन हे रक्ताचे असते. शरीरातील एकुण रक्ताच्या तुलनेत पांढऱ्या पेशींचे प्रमाण अवघे १ टक्का असते. असे हे रक्त दान केल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. यासाठी नियमित रक्तदान केले पाहिजे.