पालखी मार्गाची माहिती आता पोलिसांच्या ‘या’ वेबपेजवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याला आज पासून सुरुवात झाली आहे. पालखी मार्गाची सर्व माहिती वाहनचालकांना मिळावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी खास वेबपेज तयार केले आहे. यामुळे वाहनचालकांना पालखी दरम्यान बंद असलेले रस्ते, वाहतुकीसाठी खुले असणारे रस्ते पालखीचा मुक्काम याची माहिती वाहन चालकांना मिळणार आहे. त्यामुळे वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

वाहतूक शाखेने तयार केलेल्या वेबपेजचे नाव https://changebhai.in/palkhi2019/ असे नाव आहे. पुणे शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन बुधवारी (२६ जून) होणार आहे. दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात असणार आहे. दोन्ही पालख्यांचे आगमन पुणे शहरात झाल्यानंतर पोलिसांचे वेबपेज कार्य़ान्वित होणार आहे. हे वेबपेज पालख्या पुणे शहरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईपर्यंत कार्यान्वित राहणार असल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पालखीचे आगमन झाल्यानंतर शहरातील वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते, वाहनचालकांना वापरता येणारे रस्ते, पालखीचा मार्ग, प्रमुख चौकात पोहचण्यास लागणारा अपेक्षित वेळ, विसाव्याचे ठिकाण याबाबतची माहिती या वेबपेजच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच पालखीचे आगमन झाल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग