जगात वाजणार भारतीय खेळांचा डंका; IIT- मुंबईच्या मदतीने माहिती आणि प्रसारण मंत्रालय बनवणार गेमिंग सेंटर

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   जगात भारतीय खेळांचा डंका वाजवण्यासाठी माहिती आणि प्रसारक मंत्रालयाने मोठा उपक्रम राबवला आहे. IIT-मुंबईच्या मदतीने हे मंत्रालय गेमिंग सेंटर बनवणार आहे. हे गेमिंग सेंटर खेळाच्या विकासासाठी अनेक योजना आणि कोर्स चालू करणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी एका गेम डिझाइनिंग कॉम्पिटेशनच्या स्पर्धकांशी ऑनलाईन बोलताना ही माहिती दिली.

”भारत खेळांचे ऐतिहासिक केंद्र आहे. भारतीय खेळांची दुनिया अद्भुत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला खेळांचा प्रमुख निर्मिती देश बनवण्याचा संकल्प केला आहे. भारताला खेळात मुख्य देश बनवण्यासाठीचा पीएम मोदींचा संकल्प हे दाखवतो की, ते देशाच्या विकासासाठी दूर दृष्टिकोन ठेवतात. त्यांच्या या स्वप्नाला प्रत्येक भारतीय नागरिक साकार करेल”, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

VFX, गेमिंग आणि एनिमेशन या विषयांवर सुरु होणार कोर्स

प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले, याच विषयावर IIT- मुंबईच्या सहयोगाने मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग एक गेमिंग सेंटर बनवणार आहे. ज्यात VFX, गेमिंग आणि एनिमेशन सारख्या विषयांवर वेगवेगळे कोर्स लवकरच सुरु करणार आहे आणि यासोबतच एक सेंटर बनवले जाईल, ज्यात खेळांच्या विकासासाठी अनेक योजना असतील. केंद्रीय माहिती आणि प्रसारक मंत्री म्हणाले की, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासात अनेक खेळांच्या संदर्भात सांगितले आहे. भारताच्या या सांस्कृतिक वारसाचा पुनरुत्थान होईल आणि संपूर्ण जगावर भारतीय खेळांचा डंका वाजेल.

मोबाईलमधील गेममुळे मुलांच्या मनावर चुकीचा प्रभाव

जावडेकर म्हणाले, आजच्या आधुनिक उपकरणांमुळे, जसे की मोबाईल फोनमध्ये खेळल्या जाणाऱ्या गेममधे हिंसा, क्रूरता असे भाव आहेत. ज्यामुळे मुलांच्या कोमल मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आम्ही VFX आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून भारतीय मूल्यांवर आधारित व्हिडीओ गेम्स तयार करू शकतो, कारण भारतीय मूल्य हे मानवतेचे मूल्य आहे.