नोकरीची संधी ! Infosys कंपनीला झाला 5076 कोटींचा नफा; कंपनी देणार 26 हजार युवकांना नोकरी

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील नामांकित कंपनी असलेल्या Infosys मध्ये अधिक नफा झाल्याने यंदा Infosys कंपनी तब्बल २६ हजार जणांना नोकरी देणार आहे. आयटी सेवेच्या मागणीवरून यावर्षीच २०२१ मध्ये या नवीन भरतीची घोषणा केली आहे. तर Infosys कंपनीचा मार्चच्या तिमाहीमध्ये १७.५ टक्क्यांनी वाढून ५ हजार ७६ कोटी इतका निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये निव्वळ नफा ४ हजार ३२१ कोटी इतका होता. तर कंपनीने बुधवारी work from home मुळे IT सेवांच्या अधिक मागणीमुळे हा नफा वाढला आहे.

लसीकरण कार्यक्रम आणि गतिमान आर्थिक सुधारणेच्या अपेक्षेने यावर्षी कंपन्या अधिक प्रमाणात नोकर भरती करणार आहेत. Infosys कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख यांनी माहिती दिली की, या वर्षी भारतासह जागतिक स्तरावर २६ हजार युवकांना रोजगार देणार आहोत. कंपनी १७५० रुपये दरावर ९,२०० कोटींचे शेअर्स बायबॅक करणार आहे. तर कंपनीला २०२१-२२ वर्षी महसुलात १४ टक्के नफा होण्याचा अंदाज आहेत. मार्चच्या तिमाहीमध्ये उलथापालथ १३.१ टक्क्यांनी २६ हजार ३११ इतकी झाली. तसेच, जून महिन्यापर्यंत TCS च्या कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाखापर्यंत गेलीय. याबरोबर ही कर्मचाऱ्यांच्या एसेंचर तुलनेत दुसरी मोठी IT कंपनी तयार झाली आहे.

भारतात रेल्वेनंतर सर्वात मोठी असलेली कंपनी आहे. एसेंचरकडे ५ लाख ३७ हजार तर रेल्वेकडे १२.५४ हजार कर्मचारी आहेत. मार्च महिन्यापर्यंत TCS मध्ये ४ लाख ८८ हजार ६४९ कर्मचारी होते. कंपनी ४० हजार नोकर भरती करणार आहे. OLX च्या सर्व्हेनुसार IT , E-commerce manufacturing in logistics आणि FMCG सह इतर क्षेत्रातील कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणार आहेत. १६ टक्के कंपन्यांचे म्हणणे आहे की, ते यंदा १०० टक्के क्षमतेने नव्या नोकरीची भरती करणार आहेत.