Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं Infosys नं बंगळुरू मधील इमारत केली रिकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे काहीजणांना लागण झाल्याच्या संशयावरून देशातील मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने बेंगळुरूमधील इमारत रिकामी केली आहे. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, कोरोनाव्हायरस (COVID-19) च्या संशयावरून इन्फोसिस या सॉफ्टवेअर कंपनीने बंगळूरमधील आपली एक इमारत रिकामी केली आहे. आयटी कंपनी इन्फोसिसकडे बेंगळुरू शहरात १२ पेक्षा जास्त इमारती आहेत, ज्यात डेवलेपमेंट सेंटर्स आणि कॉर्पोरेट हाउस असलेले विशाल परिसर आहेत.

कंपनीने अधिकृतरीत्या जरी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, तत्परता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही एआयपीएम इमारत खबरदारी म्हणूनच रिकामी करीत आहोत,बिल्डिंगमधील एका टीमच्या सदस्याला कोरोना असण्याचा संशय आहे त्यामुळे बिल्डिंग रिकामी करण्यात आली आहे.

या दरम्यान ऑफिसला पूर्णपणे सॅनिटाईझ केले जाणार आहे. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना काळजी न करणे आणि सावधान राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नये.

याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी कंपनीच्या ग्लोबल हेल्प डेस्कशी संपर्क साधता येईल.गुरूवारी कर्नाटक सरकारच्या सहकार्याने कोरोनाविरूद्ध लढा लढण्याचे आश्वासन इन्फोसिस फाऊंडेशनने दिले.