Infosys ला 6 वर्षातील सर्वात मोठा ‘झटका’, 15 टक्क्यांनी शेअर घसरले, काही मिनीटांमध्ये बुडाले 45 हजार कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील आय टी सेक्टर मधील इन्फोसिस कंपनीच्या मॅनेजमेंटवर लागलेल्या गंभीर आरोपानंतर मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत कंपनीचा शेअर 15 % पेक्षा जास्त घसरला. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अवघ्या काही मिनिटांमध्ये 45 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. जर कोणाकडे आधी घेतलेले शेअर असतील तर त्याने ते होल्ड करून ठेवणे. एका अहवालात दावा करण्यात आला होता की इन्फोसिसने आपले उत्पन्न वाढवून नफा कमवण्यासाठी अनधिकृत पाऊल उचलले होते. याबाबतचे पत्र एका ग्रुपने इन्फोसिस बोर्डाला देखील लिहिले आहे.

चौकशीसाठी इन्फोसिस तयार
यासंदर्भात इन्फोसिसकडून सांगण्यात आले आहे की, सप्टेंबरमध्ये व्हिसलब्लोअर कडून दोन तक्रारी करण्यात आल्या होत्या. शार्दुल अमरचंद मंगलदास प्रकरणाबत व्हिसलब्लोअर आरोपींची स्वतंत्रपणे चौकशी करणार आहे.

शेअर्स का घसरले ?
व्हिसलब्लोअर्स ने लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की कंपनीने अधिक फायद्यासाठी अनधिकृत मार्गाचा अवलंब केला आहे. कंपनीचे सीईओ सलिल पारेख देखील यामध्ये सामील आहेत. अहवालात असे म्हंटले आहे की कंपनीचे सीईओ मोठ्या व्यवहारामध्ये गुंतवणूक मोठी असल्याचे दाखवण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करतात आणि उत्पन्न आणि नफ्याचा चुकीचा आकडा सांगायला लावतात.

अशाच प्रकारचे एक पत्र 27 सप्टेंबर रोजी अमेरिकन कंपनीला देखील आले होते. इन्फोसिसचा एडीआर (अमेरिकी डिपॉजिटरी रिसीप्ट) न्यूयॉर्कच्या चलनावर देखील अवलंबून आहे. सोमवारी एडीआर 12 % पेक्षा जास्त घसरला होता. त्यामुळे मंगळवारच्या सकाळी इन्फोसिसचे शेअर्स 15 % पेक्षा जास्त प्रमाणात घसरले.

शेअर्समध्ये झाली 6 वर्षांतील सगळ्यात मोठी घसरण
इंट्राडेमध्ये इन्फोसिसच्या शेअर्समध्ये 6 वर्षांतील ही सगळ्यात मोठी घसरण आहे. या घसरणीत कंपनीची मार्केट कॅप 3.28 लाख कोटी रुपयांवरून 2.83 लाख कोटी रुपयांवर आले आहे.

गुंतवणूकदारांनी आता काय करावे ?
या बातमीचा परिणाम जास्त वेळ राहणार नाही असे तज्ञांचे मत आहे. कारण यामध्ये कोणतीही फसवणूक झालेली नाही त्यामुळे कोणाकडे याचे शेअर्स असतील तर त्याला होल्ड करायला हवे आणि नवी गुंतवणूक लगेच करू नहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like