Coronavirus : लोकांना ‘कोरोना’ व्हायरस पसरविण्यास सांगणारा सॉफ्टवेअर ‘इंजिनिअर’ अटकेत,

‘इंफोसिस’नं काढून टाकलं

बंगलुरु : पोलीसनामा ऑनलाइन – खुल्या जागेत येऊन शिंका आणि कोरोना व्हायरस पसरवा, अशा अफवा पसरविण्यासाठी लोकांना उचकविण्याचा प्रयत्न करणार्‍या सॉफ्टवेअर इंजिनिअरला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. बंगलुरु येथील इन्फोसिस कंपनीत हा सॉफ्टवेअर इंजिनिअर कामाला होता. कंपनीने त्याला नोकरीवरुन काढून टाकले आहे.

मुजीब मोहम्मद असे या सॉफ्टवेअर इंजिनिअरचे नाव आहे. याबाबत बंगलुरु संयुक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले की, मुजीब याने लोकांना खुल्या जागेत जाऊन शिंका आणि कोरोना व्हायरस पसरवा, आवाहन फेसबुकवर केले होते. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘‘आएं साथ आएं, बाहर निकले और खुले मे छींके और वायरस फैलाएं’’ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत इन्फोसिसने ट्विट करुन सांगितले की, त्याने कोरोना व्हायरस संबंधित सोशल मिडियावर अनुचित पोस्ट केली आहे. ही कंपनीच्या नियमावलीच्या विरुद्ध आहे. कंपनीने आपली चौकशी पूर्ण केली असून आम्ही त्याला नोकरीवरुन काढून टाकले आहे. काही लोकांमध्ये कोरोना संक्रमण झाले असल्याच्या संशयावरुन इन्फोसिस कंपनीने येथील एक इमारत खाली केली होती.