MP पोलिसांची गुंडगिरी ! रिक्षा चालकाला मारहाण (Video)

इंदौर : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना कोरोना विषाणूचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. अशातच एका रिक्षाचालकाचा मास्क नाकाखाली आल्यानं (rickshaw driver mask slipped) दोन पोलिसांनी रिक्षा चालकाला बेदम मारहाण (police beat rickshaw driver) केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर वेगात व्हायरल होत असून पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

इंदोर शहरातील परदेशीपुरा भागात संबंधित मारहाणीची घटना घडली आहे. येथील रिक्षा चालक कृष्णा कंजीर यांचा मास्क नाकाच्या खाली घसरला होता. दरम्यान नाकाच्या खाली घसरलेला मास्क पोलिसांनी पाहिला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अडवून पोलीस स्थानकात येण्यास सांगितलं, पण रिक्षा चालकानं याला नकार दिला. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यानं दंडेलशाहीचा अवलंब करत रिक्षाचालकाची पँट पाठीमागून पकडली. रिक्षा चालकालाही राग अनावर झाल्यानं त्याने पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडली. यातून वाद वाढत गेला. त्यामुळे दोन्ही पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकाला भर उन्हात रस्त्यावर पाडून मारहाण केली आहे.

या व्हायरल व्हिडीओत दोन पोलीस कर्मचारी एका रिक्षा चालकाला रस्त्यावर खाली पाडून मारहाण करत आहेत. पोलिसांनी पीडित रिक्षा चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. कमल प्रजापती आणि धर्मेंद्र जाट अशी या दोन पोलिसांची नावं असून त्यांना इंदोरचे एसपी आशुतोष बागरी यांनी निलंबित केलं आहे.