Inhumanity Case | धक्कादायक ! IPS अधिकाऱ्याच्या घरात काम करणाऱ्या मुलीला भोगाव्या लागल्या नरकयातना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरियाणातील (Haryana) पंचकुलामध्ये एक धक्कादायक घटना (Inhumanity Case) उघडकीस आली आहे. हरियाणा केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी (Senior IPS Officer) पंचकूलमध्ये (Panchkula) उच्च पदावर कार्यरत आहेत. या अधिकाऱ्याच्या घरात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या मुलीवर अत्याचार (Atrocity) करण्यात आला आहे. मुलीचे हायपाय बांधून मारहाण करण्यात आली. तिला उपाशी ठेवण्यात आले होते इतकंच नाही तर एका खड्ड्यात पाणी टाकून त्यात तिला रात्रभर उभे केले होते पीडिता थरथर कापत असतानाही तिला त्यातून बाहेर येऊ दिले नाही. दरम्यान, या प्रकरणी (Inhumanity Case) पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR) केला आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याच्या घरात मुलीला दिलेल्या नरकयातना समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडितेच्या कुटूंबियांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. त्यांना थोडा हातभार लागावा म्हणून पीडितेने (Victim) प्लेसमेंट एजन्सीच्या (Placement Agency) माध्यमातून हरियाणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरी मोलकरणीची नोकरी पत्करली. फेब्रुवारी २०२१ मध्ये पीडिता कामाला लागली होती. कामाच्या काही दिवसानंतरच तिला त्रास देण्यास सुरुवात झाली. घरात असणाऱ्या खड्ड्यात पीडितेला पाणी टाकण्यास सांगण्यात आले त्यानंतर पातळ कपडे घालून त्या खड्ड्यात उभे राहण्यास सांगितले. थंडीने ती थरथर कापत होती पण तिला बाहेर येऊ दिले नाही. तिचे हातपाय बांधून मारहाण देखील करण्यात येत (Inhumanity Case) होती. इतकंच नाही तर ४८ तास उपाशी आणि तहानलेले ठेवल्यानंतर तिला चार भाकरी देण्यात आल्या.

दरम्यानच्या काळात पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला फोन केला परंतु, तिला बोलू दिले गेले नाही. ऑक्टोबर २०२१ मध्ये कुटुंबीय तिला भेटण्यासाठी अधिकाऱ्याच्या घरी गेले आणि त्यांच्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केला.
मात्र अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी त्यांना पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू दिले नाही, तर त्यांना तेथून हाकलून दिले.
त्यानंतर ४ फेब्रुवारीला पीडितेच्या वडिलांना एक फोन आला होता.
त्यांच्या मुलीची प्रकृती अत्यंत बिघडली होती आणि ती पंचकुलातील राम मंदिराजवळ बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचे सांगण्यात आले होते.
मंदिरातील लोकांनी तिला कपडे देऊन तेथेच झोपवले होते.
पीडितेचे कुटुंबीय तात्काळ तेथे पोहोचले. त्यानंतर तिला दिल्लीतील (Delhi) फतेहपूर बेरी (Fatehpur Beri) येथे आणले.
दरम्यान, लोकांनी दिल्ली पोलिसांना (DelhiPolice) या घटनेची माहिती दिली.

पीडितेची प्रकृती खूपच बिघडल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात (Safdarjung Hospital) दाखल करण्यात आले.
अद्यापही तिची प्रकृती चिंताजनक आहे. पीडितेच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी शून्य एफआयआर (Zero FIR) नोंदवून प्रकरण हरियाणा पोलिसांकडे सोपवले आहे.
पोलिसांनी ज्या प्लेसमेंट एजन्सीने पीडितेला तिथे कामावर ठेवले होते, त्यांच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

 

Web Title :- Inhumanity Case | hungry in the pit standing in the cold water a numbing story told by a girl working at an ips officer home

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा