पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पाची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी, यासाठी पब्लिक संवाद सुरु करा : विवेक वेलणकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महानगरपालिका अनेक नानाविध प्रकल्पांचे आयोजन करत असते परंतु या प्रकल्पांमुळे करदात्यांना त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार याबद्दल पत्ता देखील लागत नाही. महानगरपालिका आणि नागरिकांमध्ये संवादाचे कोणतेही पारदर्शक माध्यम सध्या उपलब्ध नाही. त्यासाठी पुणे महानगरपालिके ने सामान्य नागरिकांन साठी पब्लिक संवाद सुरु करावा. अशी मागणी सजग नागरिक संघ चे विवेक वेलणकर यानी पत्रकार परिषदेत केली.

अधिक माहिती देताना वेलणकर पुढे म्हणाले कि, ७३ आणि ७४ व्या घटना दुरूस्तीचा उद्देश नागरिकांनी कारभारात सहभाग घ्यावा हा आहे परंतु खरचचं नागरिक सहभागी होतात का याची खातरजमा करण्यासाठी कुठलाच मार्ग नाही. अनेक संस्था मिळून, पुण्याचे नागरिक व महानगरपालिका यांच्यात सकारात्मक संवाद वाढीस लागावा तसेच नागरिक व प्रशासनामधील दुरावा कमी व्हावा या साठी कार्यरत आहेत. अशा संस्था च्या मदतीने पुणे महानगरपालिके ने पब्लिक संवाद सुरु करावा. हा पब्लिक संवाद सर्वांन साठी खुला ठेवावा. असे निवेदन संघाद्वारे पुणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.