महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उपक्रम

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन  –   महामार्गावरील होणारे अपघात आणि यात होणारे मृत्युचे प्रमाण पुणे सोलापूर महामार्गावर अधिक असून याचे मुख्य कारण वाहन चालकांचा बेसिस्तपणा होय तसेच वाढत्या नागरिकीकरणामुळे वाहनांची संख्या वाढत आहे प्रत्येक गावातून महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावरुन वाहन चालक विशेषतः दुचाकीस्वार सुसाट येतो त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत याला थोडासा आळा बसावा यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका व महामार्ग पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतुक नियमाचे फलक जागोजागी लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर वाढते अपघात पाहता महामार्ग पोलीस व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका यांनी वाहतूक सुरक्षा अभियान राबविण्यासाठी प्रयन्त सुरू केले आहेत. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य भुषणकुमार उपाध्याय आणि पोलीस अधीक्षक,महामार्ग पोलीस,पुणे प्रादेशीक विभाग संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस बारामती फाटाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज नांदरे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे हवेली तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे यांनी पुणे सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या कदमवाकवस्ती, लोणी काळभोर,कुंजीरवाडी,सोरतापवाडी,उरुळी कांचन,बोरी भडक,सहजपुर,कासुरडी याठिकाणी जाऊन तेथील प्रशासक,ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच,पोलीस पाटील अश्या लोकप्रतिनिधीची भेट घेऊन वाहूतुक सुरक्षा संदर्भात आपापल्या गावात कश्या उपाययोजना राबविण्यात येतील याबाबत चर्चा करण्यात आल्या.यामध्ये प्रामुख्याने पुणे सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या गावांमधून महामार्गावर जोडणाऱ्या रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गतिरोधक बनविणे तसेच वाहतुकीचे नियम दर्शविण्यारे फलक लावणे या संदर्भात मागणी करण्यात आली यावर ग्रामस्थांनी तयारी दर्शवली आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोल नाका ते कासुरडी टोल नाका दरम्यान वारंवार होणाऱ्या अपघाताची माहिती पोलिसांना वेळेवर मिळावी यासाठी या महामार्गावर असणाऱ्या प्रत्येक गावांमधून प्रत्येक गावामधून चार ते पाच युवकांचा समावेश करुन महामार्ग व्हाट्सएप ग्रुप तय्यार करून त्यांना त्यांच्या परिसरात एखादा अपघात घडल्यास त्याची माहिती त्वरित या ग्रुपवर टाकावी व अपघाताच्या घटनास्थळी जाऊन मदत करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमाला महामार्ग पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज नांदरे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे हवेली तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे,पोलीस मित्र अतुल शिंदे,सामाजिक कार्यकर्ते बाप्पूसाहेब मेहेर व मित्र परिवाराचे सहकार्य केले.